Manmad

?️ मनमाड-नांदगाव रोडवरील पानेवाडी शिवाराजवळ अपघात.. दोन जखमी एक ठार

?️ मनमाड-नांदगाव रोडवरील पानेवाडी शिवाराजवळ अपघात.. एक जागीच ठार तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

आप्पा बिदरी

मनमाड(वार्ताहर):- मनमाड-नांदगाव रोडवरील पानेवाडी शिवारातील जोंधळवाडीच्या भोगनदीजवळ छोटा हत्ती चार चाकी आणि मोटरसायकल यांच्यात समोरासमोर भीषण अपघात होऊन दोन जण गंभीर जखमी झाले तर एक जागीच ठार आणि एकाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याची घटना आज शुक्रवारी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे.या घटनेने पानेवाडीसह परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान पानेवाडी ग्रामपंचायतीची रुग्णवाहिका तब्बल एक तास उसीराने आल्यामुळे उपचार होऊ न शकल्याने एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याचे प्रथमदर्शनी यांनी सांगितले आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की,मनमाड कडून एम.एच.१५ एफ.व्ही ४६४० हा छोटा हत्ती चार चाकी गाडी नांदगावकडे ऑईलचे बॉक्स घेऊन जात होती तर नांदगाव वरून पानेवाडी येथे दोन मोटर सायकलस्वार येत असताना चार चाकी छोटा हत्ती गाडीचे टायर फुटल्याने गाड़ी मोटार सायकलवर जावून नालित पलटी झाली.त्यामुळे हा भीषण अपघात घडला यामध्ये चार चाकी गाडी पाच फूट नालीत जाऊन पलटी झाली असून चालक गंभीर जखमी झाला तर मोटार सायकलच्या पाठिमागे बसलेले भास्कर कांदे,रा.जळगाव बु.वय ६० हे लवकर उपचार न मिळाल्याने ठार झाले.तर रमेश कांदे,रा.पानेवाडी यांच्या तोंडाला,हाता, पायाला गंभीर मार लागल्याने जखमी झाले असून त्यांना मालेगावच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.त्यांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.अपघाताची माहिती कळताच मनमाड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे,हवालदार आर.जी.जगताप,व्ही.जे.सोनवणे,चंदू मांजरे,आदिनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. दरम्यान अपघात घडल्याने नंतर पानेवाडी येथे हिंदुस्थान पेट्रोलियम या इंधन कंपनीने नवी रुग्णवाहिका या परिसरातील अपघात व इतर रुग्णासाठी देण्यात आली आहे.मात्र त्या रुग्णवाहिकेचा चालक कधीच वेळेवर हजर नसल्यच्या अनेक तक्रारी आहे.त्यात आजही वारंवार फोन करूनही तब्बल एक तास उशीराने आल्यामुळे अपघात ग्रस्थाना जीव गमवावा लागल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.त्यामुळे पानेवाडी ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेला फोन करूनही ती वेळेवर येत नसल्याने अनेकांना जीव आणि अपंग पप्तकरावे लागल्याच्या घटना घडल्या असल्याची माहिती घटनास्थळावरुन मिळाली असून सदरची रुग्णवाहिका या परिसरात कुठलाही अपघात झाला तरी तातडीने उपलब्ध होत नसल्याने सदर रुग्णवाहिका ही हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीने ताब्यात घेऊन त्यांच्या आवारात अभी करून त्यावर कायमस्वरूपी चालकाची नेमणूक करण्याची मागणी बाजार समितीचे संचालक तथा पानेवाडीचे माजी सरपंच बाळासाहेब आव्हाड,जोंधलवाडी येथील राष्ट्रवादीचे उपजिल्हा अध्यक्ष दत्तू काळे अदिसह नागरिकांनी केली आहे.

सोबत फोटो—-

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button