Manmad

व्यापाऱ्याची शेतकऱ्याला दादागिरी

व्यापाऱ्याची शेतकऱ्याला दादागिरी

मनमाड | प्रतिनिधी आप्पा बिदरी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिवन आवश्यक वस्तुंचे दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश होते. शेतीशी निघडीत असणाऱ्या दुकांने उघडी ठेवण्याचा आदेश दाखवत शहरातील बिल्डींग मटेरियल चे दुकाने चालू केली. टाळेबंदीचा फायदा घेत या दुकानदारांनी अव्वाच्या – सव्वा भावाने मटेरियल विकण्याचा धंदा सुरू ठेवला असून याकडे प्रशासन लक्ष देईल का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहरामध्ये लॉकडाउनच्या काळात ही बिल्डिंग मटेरियलचे दुकाने सुरु आहे.

अव्वाच्या, सव्वा भावने मटेरीयल विकत असून कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी तो कांदाचाळीत साठविण्याचा विचार केला आहे. त्यासाठी लोखंडी पत्रे,पाईप इत्यादि बांधकाम साहित्य घेण्यासाठी गर्दी केली.दुकानदार मनमानी पद्धतीने त्याचे भाव आकारीत असून तरही एकच गर्दी झाल्याने अरेरावी आणि मनमानी कारभार करीत असल्याने बाचाबाची झाल्याचे चित्र पहावयास मिळाल्याचा प्रकार चांदवड रोडवरील एका दुकानात घडला.गोंधळ होताच दुकानदाराने शटर बंद करून घरी गेला.मात्र यावेळी उपस्थित शेतकरी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करून अशावर कारवाई करण्याची मागणी अनेकांनी केली आहे.

शेतकऱ्यां मालाला भाव मिळेल म्हणून साठवण्यासाठी चाळी बनवून साठवनुक करणार असल्याने त्याचे साहित्य घेण्यासाठी बिल्डिंग मटीरियलच्या दुकानात गर्दी केली.मात्र दुकानदाराचा मनमानी कारभार आणि अरेरावीची भाषा ऐकविल्याने त्यांच्यात तीव्र संताप व्यक्त झाला आणि शाब्दिक चकमकी घडल्या सांगण्यात आल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.शेतकऱ्यांचा कोणी कैवारीच राहिला नसल्याची तीव्र प्रतिक्रया व्यक्त केली.दुकानदाराने आपले दुकान बंद करून घरी निघून गेला.तर अनेकांनी दुकानदाराला फोन केले मात्र त्याने उचलले नाही.त्यामुळे शेतकरी,नागरिक यांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागले.अशा मुजोर दुकानदारावर संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी यावेळी अनेक शेतकरी व नागरिकांनी केली.दरम्यान सर्वत्र लॉकडाउनमुळे अत्यावश्यक वस्तुंचे दुकाने सोडले तर सर्व बंद असतांना ही दुकाने चालू कशी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.दरम्यान सीमेंट,स्टिल आदि बांधकाम मटीरियल वस्तुचे काही दुकानदार मनमानी पद्धतीने पैसे घेत असून त्यांना विचारले तर कंपनीकडून जास्त भावाने मिळत असल्याचे सांगितले जाते.मात्र जास्त दराने सामान घेऊन ही दुकानदाराची अरेरावी ऐकावी लागत असल्याचे वाईट वाटते.त्यामुळे अशा दुकानदारावर प्रशासनाची अवकृपा असेल म्हणून तो मुजोरीपनाने शेतकऱ्यांना वागणूक देतो.अशावर कारवाई झाली पाहिजे.अशी मागणी जोर धरु राहिली.

कांद्याला अपेक्षित भाव नसल्याने बाहेर शेतात पडलेला कांदा साठविन्यासाठी चाळ बनवायची आहे.त्यामुळे सामान घेण्यासाठी गेलो असता तेथे खुप गर्दी होती.म्हणून माझी लिस्ट घ्या मी नंतर येतो असे बोलत असतांना दुकानदाराने हुज्जत घालून अरेरावी केली.अशा अनेकांना अशीच वागणूक दिली.त्यामुळे शेतकऱ्यांचे कोणी वाली राहिले नसल्याने जेथे,तेथे पैसे देऊन अपमानास्पद वागणूक मिळते.
— अजित कातकडे, शेतकरी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button