Manmad

करोनावर मात : मालेगाव शहर बंदोबस्तातील ९६ पोलिस कर्मचारी करोना मुक्त

करोनावर मात : मालेगाव शहर बंदोबस्तातील ९६ पोलिस कर्मचारी करोना मुक्त

मनमाड I प्रतिनिधी आप्पा बिदरी

करोना विषाणुच्या प्रादुर्भावापासुन नागरीकांना वाचविण्यासाठी पोलीस यंत्रणा रात्रंदिवस कर्तव्य बजावित आहे. करोनाविरुध्द लढणा-या योध्दयांनाच संसर्गाने विळखा घातला असुन, मालेगाव शहरात बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. त्यातच एक दिलासादायक वृत्त आले असुन मालेगावातील तब्बल ९६ करोना बाधित पोलीसांनी करोनावर मात केली आहे.

करोनामुक्त झालेले पोलिस योध्दयांमध्ये नाशिक ग्रामीण पोलिस दलाचे ४३ पोलीस, जालना एस.आर.पी.एफ.चे ३८ पोलीस, औरंगाबाद एस.आर.पी.एफ. चे ५, अमरावती एस.आर.पी.एफ.चे ६, मरोळ आणि धुळे पोलिस प्रशिक्षण केंद्राचे २ व जळगाव पोलीस दलातील ०२ असे एकुण ९६ पोलिसांनी कोव्हीड १९ करोना आजारावर मात करून उपचाराअंती बरे झालेले आहेत. यातील काही पोलिस कर्मचारी या आजारातुन बरे होऊन पुन्हा डयुटीवरही हजर झाले आहेत. नाशिक ग्रामीण जिल्हयाच्या पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी करोना मुक्त झालेले पोलीस कर्मचा-यांचे अभिनंदन व्यक्त केले असुन जिल्हयातील विविध माध्यमांव्दारे करोनामुक्त झालेल्या पोलिसांना शुभेच्छा दिल्या आहे.

नागरीकांच्या रक्षणासाठी पोलिस आज ही न घाबरता उभे आहेत, तर करोना बाधित पोलिस योदयांनी या आजारावर मात ही केली आहे, त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. करोना सारख्या संकटाचा आपण एकजुटीने सामना करून त्यावर पुर्णतः मात करू असा संदेश यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. सिंह यांनी दिला असुन संकटात सहकार्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी पोलीस अधीक्षक स्वतः त्यांचेसोबत कर्तव्य बजावत आहे. करोना आजारावर यशस्वीरित्या मात करून रूग्णालयातुन बरे होऊन परतणा-यांची संख्या वाढत असुन उर्वरित रूग्णही करोनातुन सुखरूप मुक्त होतील यामुळे पोलिसांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button