Manmad

मनमाड येथून पर प्रांतीयांसाठी बस रवाना

मनमाड येथून पर प्रांतीयांसाठी बस रवाना

मनमाड I प्रतिनिधी आप्पा बिदरी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या मनमाड आगारच्या वतीने बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानुसार छत्तीसगड येथील नागरिकांसाठी मनमाड बस स्थानकातून एक बस बॉर्डर पर्यंत रवाना करण्यात आले.तसेच इतर राज्यात जाणाऱ्या परप्रांतीयांना सहा बसेस या नाशिक रेल्वे स्थानक पर्यंत सोडण्यात आल्या. अशा एकुण मनमाड आगारातुन ७ बसेस रवाना करण्यात आल्या.

मनमाड बस आगारातून नांदगाव आणि चांदवड तालुक्यातून सहा एसटी बस आणि छत्तीसगड साठी एक बस द्वारे १४७ परप्रांतीय प्रवाशांना नासिक रोड रेल्वे स्थानकात आणि छत्तीसगडसाठी मार्गस्थ करण्यात आले. नाशिक रोड रेल्वे स्थानकातून श्रमिक एक्स्प्रेस रेल्वेगाडीने अडकलेले हे प्रवासी आपापल्या प्रांतात जाणार आहेत. पण त्यांच्या मदतीला धावली. सर्वसामान्यांची महाराष्ट्रातली एस .टी. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे मोठ्या प्रमाणात परप्रांतीय महाराष्ट्रात अडकलेली आहेत त्यांना त्यांच्या गावी पोहोच करण्यासाठी एसटी महामंडळाने एसटी महामंडळाने मदतीचा हात दिला. नांदगाव आणि चांदवड तालुक्यात आणि मनमाड परिसरात खोळंबलेल्या या परप्रांतीयांना नाशिक रोड येथे हे रेल्वेस्थानकात सोडवण्यासाठी नांदगाव तालुक्याचे चार ,चांदवड तालुक्याच्या दोन अशा सहा बसेस मनमाड बस आगारातून उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच छत्तीसगड साठी एक विशेष बस सोडण्यात आली. या सहा बसमधून १४७ परप्रांतीय नागरिक मनमाड येथून नासिक रोड रेल्वेस्थानका साठी मार्गस्थ झाले.

यावेळी तहसीलदार योगेश जमधडे, मनमाड पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, मनमाड बस आगाराचे व्यवस्थापक प्रीतम लाडवंजारी ,नगरपालिका मनमाड अधिकारी-कर्मचारी आधी यावेळी उपस्थित होते .या सर्व १४७ प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने या प्रवाशांना मनमाड येथून सात एसटी बस द्वारे मार्गस्थ करण्यात आले.

मनमाड बस आगारातून शनिवारी दुपारी सहा एसटी बसद्वारे १४७ परप्रांतीयांना येथून मार्गस्थ करण्यात आले. याबाबत सर्व आवश्यक ती पूर्तता आणि वैद्यकीय तपासणी करण्यात आले. – प्रितम लाडवंजारी, मनमाड एसटी आगार प्रमुख

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button