Maharashtra

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांचे रक्तदान

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांचे रक्तदान

प्रतिनिधी फहिम शेख

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 2 : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि नंदुरबार जिल्हा राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले.

यावेळी सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा रुग्णालयाचे रक्त संकलन अधिकारी, डॉ.एस.ए.सांगळे, जनसंपर्क अधिकारी महेंद्र चव्हाण, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, जयेश सोनवणे, हेमंत माळी आदी उपस्थित होते.

शिबिरात निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हाधिकारी कैलास कडलग, तहसीलदार उल्हास देवरे, सहायक उपनिबंधक निरज चौधरी या अधिकाऱ्यांनी रक्तदान केले. शिबिरास विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दिवसभरात 28 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. त्या सर्व रक्तदात्यांना राज्य रक्त संक्रमण परिषदचे प्रमाणपत्रही यावेळी वितरीत करण्यात आली. नागरिकांनी रक्तपेढीत जावून रक्तदान कराव, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे यावेळी करण्यात आले.

नंदुरबार जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हेमत देवकर, उपाध्यक्ष मिलिद निकम, सहायक चिटणीस, हेमत मरसाळे आदींनी या शिबिराच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
00000

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button