Faijpur

एड्स रोगाचं जगात वाढणार प्रचंड प्रमाण अतिशय चिंताजनक श्री.देवेंद्र पाटील यांचे प्रतिपादन

एड्स रोगाचं जगात वाढणार प्रचंड प्रमाण अतिशय चिंताजनक श्री.देवेंद्र पाटील यांचे प्रतिपादन

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपुर तालुका यावल

येथील)जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती करण्याच्या उद्देशाने भुसावळ कला विज्ञान आणि पु.ओ नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या NSS +2 स्तर या विभागातर्फे कार्यसंस्कृती अभियाना अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानात मार्गदर्शन करताना प्रा. देवेंद्र पाटील यांनी जगात एड्स प्रचंड प्रमाणात वाढणारी आकडेवारी अतिशय चिंताजनक असल्याचं सांगून रोगाचा वायरस शरीरात पसरल्यानंतर तो शरीरावर कसा दुष्परिणाम करतो, त्याचे शरीरावर कसे विपरीत परिणाम होतात, हे पावर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे अतिशय समर्पक शब्दात विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. याप्रसंगी राज्यशास्त्र परिषदेचे राज्य समन्वयक प्रा शाम दुसाने, पर्यावरण शिक्षण विभाग प्रमुख प्रा एम. एल गोसावी, यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.उत्तम सुरवाडे हे होते, या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉ.मोहन भाऊ फालक चेअरमन महेश भाऊ फालक ,सचिव श्री विष्णू भाऊ चौधरी ,कोषाध्यक्ष संजय कुमार जी नाहटा,प्राचार्य डॉ. मीनाक्षी वायकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. अतिथी म्हणून राज्यस्तरावर ज्यांनी जनजागृती मध्ये अतिशय मोलाची कामगिरी बजावलेली आहे .जळगाव येथील प्रख्यात डॉ.भागवत महाजन हे होते. त्यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. तर अतिथी म्हणून पर्यवेक्षिका श्रीमती शोभा तळेले कार्यक्रम अधिकारी डॉ.भाग्यश्री भंगाळे, समन्वयक प्रा. राजेंद्र खेडकर. श्रीमती प्रा.स्वाती पाटील, प्रा टी एस सावंत, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भाग्यश्री भंगाळे . सूत्रसंचालन प्रा.सौ.आर पी मसाने यांनी केले. आभार प्रा महेश सरोदे यांनी मानले. प्रा. जे.डी धांडे, प्रा एच बी राजपूत, प्रा व्हि डी सावकारे. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी या सर्वांनी परिश्रम घेतले covid-19 नियमांचे पालन करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्यामुळे सर्व स्तरातून पालक आणि विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button