Amalner

गांधली येथील मजूरी करणार्‍या बंधू-भगिनींना पाणी फाउंडेशनने दिली योजनांची माहिती

अमळनेर तालुक्यातील गांधली या गावांमध्ये न्यू ल्फाॅट दूर्गामाता चौक येथे असे काही लोक आहेत की त्यांना शेती वगैरे काही नाही ते फक्त मोलमजूरी करूनच जीवन जगतात अशा मजूरी करणार्‍या बंधू-भगिनींना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसंदर्भात पाणी फाउंडेशन टीम कडून सविस्तर माहिती दिली

अमळनेर : अमळनेर तालुक्यातील गांधली या गावांमध्ये न्यू ल्फाॅट दूर्गामाता चौक येथे असे काही लोक आहेत की त्यांना शेती वगैरे काही नाही ते फक्त मोलमजूरी करूनच जीवन जगतात अशा मजूरी करणार्‍या बंधू-भगिनींना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसंदर्भात सविस्तर माहिती दिली अमळनेर तालुक्यात बिहार पॅटर्न अंतर्गत सुरू असलेल्या वृक्ष लागवड चळवळी संदर्भात व बिहार पॅटर्नच्या माध्यमातून काम करणेसाठीच्या नियम व अटी संदर्भात पाणी फाउंडेशन टीम कडून सविस्तर माहिती दिली माहिती देतात या ठिकाणी महेंद्र महाजन व त्यांच्या सर्व मजूर बंधू- भगिनींनी आम्ही देखील या बिहार पॅटर्न योजनेअंतर्गत काम करू स्वतः आर्थिक समृद्ध तर बनू पण पर्यावरण समृद्धी साठी व पर्यावरण रक्षणासाठी मोठ्या प्रमाणात काम करू व अमळनेर तालुक्यातील वृक्ष लागवडीची चळवळ मोठी करू व दुष्काळावर ती मात करू असे सांगितले या कार्यक्रमासाठी समृद्ध गाव स्पर्धेचे समृद्ध गाव योद्धे मनोज श्री गणेश सर, नितीन महाजन सर व दिनेश पवार यांनी आयोजन केले त्याच बरोबर गांधली गावचे रोजगार सेवक सचिन ठाकरे यांनी जॉब कार्ड काढण्यासंदर्भात सविस्तर माहिती दिली व बिहार पॅटर्न वृक्ष लागवड चळवळ मोठे करण्यासाठी रोजगार सेवकाची भूमिकेतील कामे सर्व पार पाडू असे सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button