पंढरपूर

स्वेरीज् फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे तावशीमध्ये वृक्षारोपण व आरोग्य विषयक जनजागृती संपन्न

स्वेरीज् फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे तावशीमध्ये वृक्षारोपण व आरोग्य विषयक जनजागृती संपन्न

प्रतिनिधी
(रफिक आत्तार)

पंढरपूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,सोलापूर व स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजने (रासेयो) अंतर्गत दि.१७ डिसेंबर पासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये पदवी फार्मसीचे विद्यार्थी तावशीतील ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन ‘वृक्षारोपण व आरोग्य विषयक जनजागृती’ हे कार्यक्रम राबविले. तेथील ग्रामस्थांना वृक्षांचे महत्त्व पटवून सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी गावामध्ये उकिरड्याच्या बाजूने शेडनेटची उभारणी केली. या शेडनेटमुळे गावातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. आयुर्वेदाचार्य डॉ राखी मणियार यांनी गावातील सर्व महिलांना आरोग्यावर मार्गदर्शन केले. यावेळी तेथील महिलांनी आरोग्याविषयी समस्या मांडल्या असता डॉ. राखी मणियार यांनी ते तत्काळ निदान केले. काही वैयक्तिक आरोग्य विषयक अडचणी सोडवण्यासाठी सल्ले दिले व महिलांनी घ्यावयाची आरोग्याची काळजी यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास गावातील महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला तावशी गावाच्या सरपंच सौ.सोनाली गणपत यादव, साधना विद्यालयाचे सचिव बाळासाहेब यादव,भुजंगराव यादव, मिलिंद यादव,उपसरपंच अल्लाभाई मुलाणी,धनाजी यादव, पोलिस पाटील कबीर असबे,पत्रकार पांडुरंग सूर्यवंशी यांची मदत लाभली. हा कार्यक्रम स्वेरी संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली फार्मसीचे प्राचार्य डॉ.अमित गंगवाल यांच्या नेतृत्वाखाली फार्मसीचे रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. मिथुन मणियार व प्राध्यापकांच्या सहकार्याने सुरळीत पार पडत आहे. यावेळी प्रा. शिंदे, प्रा.लता पाटील,प्रा.प्रांजली शरुख, विद्यार्थी सचिव स्वप्निल राऊत आदी उपस्थित होते. स्वेरी फार्मसीचे रासेयोचे युनिट फार्मसी कॉलेजच्या स्थापनेपासून राष्ट्रीय सेवा योजनेच्या निमित्ताने तालुक्यातील व आसपासच्या गावांमध्ये विविध उपक्रम राबवून नागरिकांना स्वच्छतेतून समृद्धीकडे घेवून जाताना समाजसेवेचे काम अविरत करत आहेत. ‘माझ्यासाठी नव्हे, तुमच्यासाठी’ या रा.से.यो.च्या ब्रीदवाक्याप्रमाणे काम करत तावशी गावामध्ये स्वच्छतेबरोबरच विविध सामाजिक उपक्रमदेखील मोठ्या उत्साहाने राबवत आहेत. या कार्यक्रमाचा समारोप उद्या होईल या शिबिराअंतर्गत तावशी गावामध्ये विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या परिश्रमाला तावशीमधील ग्रामस्थ मदतीचा हात पुढे करत आहेत.
छायाचित्र- तावशीमध्ये स्वेरीच्या वतीने वृक्षारोपण व आरोग्याविषयी मार्गदर्शन संपन्न झाले याप्रसंगी सरपंच सौ. सोनाली यादव, वैद्य डॉ. राखी मणियार व तावशीतील महीला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button