Faijpur

जनजागृतीचा एक भाग म्हणून सुविधा सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळ,आसाराम नगर,फैजपूर

जनजागृतीचा एक भाग म्हणून सुविधा सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळ,आसाराम नगर,फैजपूर

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : विशेष सहकार्य “छावा मर्दानी खेळ आखाडा,फैजपूर”
आयोजित
जनजागृती प्रदक्षिणा
विविध विषयांवर सभामंडपात जनजागृती मोहित पोस्टर द्वारे आणि लेखांद्वारे करण्यात आले आहेत,यात गणेशोत्सव आणि पर्यावरण महत्व, घातक सवयी सोडा आणि पर्यावरण वाचवा,स्त्री भ्रूणहत्या: समस्या आणि उपाय,उठा युवकांनो,स्त्री भ्रूणहत्या,हुंडाबळी,शेतकरी आत्महत्या एकच माळेतील तीन मणी, सण,समाज आणि पर्यावरण,वृक्ष आणि जंगलतोड,मुलगी वाचवा मुलगी शिकवा,गणेश चतुर्थीचे निसर्गावर होणारे परिणाम,आयुर्वेद माहिती,नात्यातील विश्वास हरविला,पाश्चिमात्य संस्कृतीचा परिणाम,अश्लील मनोरंजन थांबवा,अविचारी प्रकार,आत्मपरीक्षणाची गरज,कुटुंबाचा मुळ चेहराच बदलतोय,भरकटलेला समाज,नाती टिकवा,एकत्र कुटुंब पद्धती अनुसरावी,प्रकृती,प्रवृत्ती आणि विकृती,इंटरनेट चे महत्व,ऑनलाईन सुरक्षितता,चंगळवाद फोफावला असे बरेच विषय घेऊन लेख माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत,जेणेकरून आपल्या समाजात जे ही गुन्हे घडत आहे आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे त्याला आळा बसावा हाच हेतू,तसेच लोकमान्य टिळकांनी कुठल्या हेतूने गणेशोत्सव ची सुरुवात केली हाच विचार घेऊन आम्ही हा एक छोटा जनजागृतीचा प्रयत्न करत आहोत,आपण सर्वांनी या जनजागृतीचा एक भाग व्हावा हीच इच्छा,तसेच श्रींची मूर्ती ही १ फुटाची आणि शाळू मातीची आहे,पर्यावरण पूरक गणेशोत्सव आणि पर्यावरणपूरक सजावट,गणेशोत्सव हा ७ दिवसांचा आहे,गणपती विसर्जन हे मंदिराचा आवारातच पाण्याच्या तळ्यात करण्यात येणार आहे,यामुळे नदीत होणारे प्रदुषण सुध्हा कमी होण्यास मदत होईल,हीच संकल्पना प्रत्येकाने अवलंबवावी एवढी आश छावा मर्दानी खेळ आखाडा,फैजपूर अध्यक्ष महेश वाघोदेकर यांनी व्यक्त केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button