Maharashtra

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे आपल्या घरची प्रॉपर्टी समजु नये ….उदय पाटील , कृ.उ.बा.स.अमळनेर

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे आपल्या घरची प्रॉपर्टी समजु नये ….उदय पाटील , कृ.उ.बा.स.अमळनेर

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे आपल्या घरची प्रॉपर्टी समजु नये ….उदय पाटील , कृ.उ.बा.स.अमळनेर

अमळनेर प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्ता स्थापन करते वेळी आदरणीय नाथाभाऊ व आदरणीय पालक मंत्री ना.श्री.गिरीषभाऊ महाजन साहेब यांच्या मध्यस्थीने शिरीषदादा मित्र परिवार व भारतीय जनता पार्टी एकत्र येवुन सत्ता स्थापन झाली जो अगोदर सभापती होईल तो 2 वर्षासाठी पदावर राहील नंतर होणाऱ्यास 3 वर्ष असे ठरलेले असतांना आमदार शिरीषदादा व संचालकांनी वारंवार तगादा लावुन देखील अति लोभापोटी राजीनाम न देणारे शब्द न पाळणारे चेअरमन उदय वाघ यांनी कृ.उ.बा.समितीत हुकूमशाही राजवट चालू केलेली आहे जसे..
1)   गेल्या दोन वर्षापासुन कुठलीही मासिक मिटींग न घेता 4 ते 6 महिन्यात एकत्रीतरित्या प्रोसिडींगवर सह्या घेणे.
2)   प्रोसिडींगवर सह्या घेतांना आतील 3 ते 4 पानं कोरे ठेवुन आपल्या पध्दतीने सोयीस्कर रित्या बेकायदेशिर खर्च व संचालकांना माहीत नसणारे विषय लिहुन घेणे.
3)   मासिक मिटींगच्या अजेंडा घरी पाठवतांना बंद पाकीटात बाजार भावचे दर पत्रक पाठवुन अजेंडा पोहोचला असल्याची सही घेणे.
4)   प्रोसिडींग बुकवर व इतर ठिकाणी संचालकांच्या खोट्या सह्या करणे.
5)   जाहिरात व प्रसिध्दी फलक साठी अवाजवी खर्च करणे.
6)   गोडावुन स्किम मधील गाळे व्यवसायीक शॉप म्हणुन विकणे त्यात रोख रक्कम सबंधीतां कडुन घेणे.
7)   गाळे हस्तांतरण करतांना हस्तांतरण फी घेऊन मध्यस्थींन मार्फत वरच्या वर मलीदा मागीतला जातो.
8)  धुळे रोडला असलेले शॉपिंग सेंटर मधील मुतारी विना परवानगी तोडुन त्या ठिकाणी व्यवसाईक शॉप तयार करुन नियमांची पायमल्ली करणे.
9)   धुळे रोड वरील शॉपिंग मध्ये नाल्याच्या कोपऱ्यावर अतिक्रमण करुन प्लॅन मध्ये मंजुर नसतांना बेकायदेशिर शॉप बांधणे.
10) कृ.उ.बा. समीतीच्या मासिक मिटीगचा वृत्तांत स्वत: संचालकांना माहीतीच्या अधिकारात पत्रव्यवहार करुन मागावे लागतात. तरी माहीती न देणे जेणे करुन त्यातील गैरव्यवहार बाहेर येवु नये म्हणुन कृ.उ.बा.स. चे प्रोसिडींग बुक स्वत:च्या ताब्यात ठेवणे.
11) माहीती अधिकाराबाबत आयुक्तांपर्यंत अपिलात जावून उप आयुक्तांनी उप सचिवांना 18,000/- रु. दंडाची नोटीस देवुन देखील माहीती न देणे.
12) मागीतल्या प्रमाणे प्रोसिडींगच्या नकला मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावरचे भ्रष्टाचार उघडकिस येतील म्हणुन स्वत: संचालकांना देखील प्रोसिडींगच्या नकला न देणे.
13) कृ.उ.बा.समितीत मृत संचालक अनिल अंबर पाटील यांच्या जागी त्यांच्याच कुटूंबातील व्यक्तीला को-ऑप मध्ये घ्या अशी मागणी आ.शिरीषदादा मित्र परिवाराने केलेली असतांना संचालकांना कुठलीही कल्पना न देता आपल्याच कार्यकर्त्याचे नाव पाठविणे.
14) उप-सभापती पदावर नियुक्ती करतांना मिटींगचा अजेंडा न देता बंद पाकिटात बाजार भाव  पत्रक पाठवुन संचालकांची दिशाभुल करणे.
15) उप-सभापती पदावर नियुक्ती करतांना कोऱ्या प्रोसिडींगवर सह्या करुन एक मताने निवड झाल्याचा ठराव करणे.
16) उप-सभापती पदाची निवड हि दिनांक.30/5/2019 च्या ठरावात दाखवली आणि सदर निवडीचा बवाल होऊ नये म्हणुन काही दिवस शांत राहुन आज रोजी 28/6/2019 ला जाहीर करणे की उप-सभापती निवड झाली.
कै.मल्हारी नाना पाटील , मा.आ.अमृतआप्पा पाटील , भैय्यासाहेब रामभाऊ पाटील , प्रकाश आबा पाटील  व इतर माजी चेअरमन यांच्या कार्यकाळात प्रखर विरोधक असतांना देखील बाजार समितीचे कामकाज हे लोकशाही पध्दतीने चालविले या इतिहासाला काळीमा फासणारे काम या सभापतींनी केले आहे.
पारदर्शी कारभार करत असल्याचा कांगावा जनतेला दाखवायचा आणि 30/5/2019 ला दाखवलेली निवड 28/6/2019 ला जाहीर करायची गरज का पडते ?  असे अनेक प्रश्न  संचालकांना पडलेले आहेत. परंतु स्वत: जिल्हाध्यक्ष , पत्नी आमदार , राज्यात व केंद्रात माझ्याच पक्षाची सत्ता असल्याने माझे काही एक वाकडे होणार नाही अशी शेखी मिरवत भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्याचे काम सभापती महोदयांकडुन होत आहे. म्हणुन आम्ही सर्व संचालक त्यांचा ,कार्यपध्दतीचा व भ्रष्टाचाराचा निषेध करीत असुन सदर विषयांवर तक्रारी दाखल करुन प्रसंगी कोर्टात जावून शेतकरी कष्टकरींची संस्था वाचविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
 
1)    उदय नंदकिशोर पाटील                              ———————
2)    पद्माकर रामदासगिर गोसावी                      ———————
3)    सुरेश पिरन पाटील                                       ———————
4)    महेश प्रभाकर देशमुख                                  ———————
5)    भगवान अभिमन कोळी                                 ———————

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button