Dhule

हिंदी बोलणाऱ्या बँक मॅनेजर ला शिवसैनिकांचा घेराव..

हिंदी बोलणाऱ्या बँक मॅनेजर ला शिवसैनिकांचा घेराव..

धुळे : तालुक्यातील पिंपळनेर येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरला हिंदीतून बोलण्यावरून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी घेराव घातला व आदिवासी भागात बँकेमध्ये येणारे बहुतेक नागरिक हे आदिवासी असल्यामुळे हिंदीतून बोलणाऱ्या कर्मचारी व बँक मॅनेजरच म्हणणं नागरिकांना समजत नसल्यामुळे अखेर शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बँक मॅनेजरला मराठीतून बोलण्यावरून घेराव टाकून शिवसेना स्टाईलने समजावण्याचा प्रयत्न केला आहे.

वसाक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये गेलेल्या महिला लोकप्रतिनिधीस बँकेचे मॅनेजर व कर्मचाऱ्यांनी अरेरावीची भाषा करून महिलेचे काम करून देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी जाब विचारण्यास गेलेल्या शिवसैनिकांना देखील अरेरावीची भाषा करण्यात आल्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी बँक मॅनेजरला घेराव टाकत चांगलेच धारेवर धरले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button