Dhule

रेकॉर्डब्रेक कोवीड-१९ लस महोत्सव प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडी अंतर्गत, येणारे उपकेंद्र, कोडीद ता.शिरपूर येथे २ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त “जन अभियान कार्यक्रम” अंतर्गत ७०० लाभार्थ्यांना भव्य महालसीकरण मोहीम राबविण्यात आले.

रेकॉर्डब्रेक कोवीड-१९ लस महोत्सव

प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडी अंतर्गत, येणारे उपकेंद्र, कोडीद ता.शिरपूर येथे २ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त “जन अभियान कार्यक्रम” अंतर्गत ७०० लाभार्थ्यांना भव्य महालसीकरण मोहीम राबविण्यात आले.

राहुल साळुंके धुळे

जिल्हा टास्क फोर्स समिती व जिल्हाअधिकारी ह्यांच्या आदेशान्वये आज उपकेंद्र, कोडीद येथील आजचे महालसीकरण शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोडीद
२ऑक्टोंबर रोजी कोविड महालसीकरण आयोजित करण्यात आले उद्घाटन प्रसंगी धुळे जिल्हा; अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा लसीकरण संनियंत्रण अधिकारी डॉ.प्रसन्न कुलकर्णी सर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र बागुल सर ह्यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख उपस्थितीत उद्घाटन पार पाडण्यात आले.

जागतिक महामारितून सर्व पेलून माझ्या आरोग्य विभागातील कार्यरत सर्व घटक नेहमी नेमलेली कामगिरी फत्ते करते हे गर्वाने मिरवण्याची संधी काम करतांना देतात हे नेहमी अभिमानास्पद वाटते.
मनुष्यबळ कमी असूनही आजच्या महालसीकरण मोहिमेला यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडी चे वैद्यकीय अधिकारी डॉ.नीलिमा देशमुख, उपकेंद्र कोडीद येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा, आरोग्य सेविका श्रीमती पी.ए. गिरासे, आरोग्य सेवक ए.पी.नेटके, औषधनिर्माण अधिकारी श्री.शाम पावरा, गट प्रवर्तक,ज्योती पावरा, आशा सेविका हयांच्या प्रचंड सकारात्मक कामामुळे व सकाळी ८ वाजेपासून संध्याकाळी ८ पर्यंत अखंड कामामुळे यशस्वी पार पडले.

ह्यावेळी शासकीय माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री.सैंदाणे सर व स्टाफ, दि.न.पाडवी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. टी.टी.बडगुजर व सर्व स्टाफ, जि.प.केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री. तापिराम पावरा सर व स्टाफ, ग्रामविकास अधिकार श्री.सुर्यवंशी व स्टाफ व सर्व कर्मचारी तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन पार पाडण्यात आले.

ह्या “जन अभियान कार्यक्रम” यशस्वी पार पाडण्यासाठी आदल्या दिवशी कोडीद परिसरातील सर्व गावांमध्ये दवंडी व गाडीने स्पीकर लाऊन ध्वनीफीती मार्फत जनजागृती करण्यात आली त्यामुळे आजचा कार्यक्रम घराघरात पोहचला त्यामुळे एवढा मोठा लोकांमध्ये उत्साह व जनजागृती व लोकसंख्या वाढण्यास मदत मिळाली.

ह्यावेळी उपकेंद्र,कोडीद येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा ह्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मनापासून काम करणारे सर्व आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, ग्रामपंचायत कोडीद, गावातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळेतील शिक्षक वृंद ह्यांचे आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button