Dhule

विसपूते माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक श्री अविनाश पाटील यांना शैक्षणिक दीपस्तंभ ने राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार देऊन केला शैक्षणिक कार्याचा सन्मान…..

विसपूते माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक श्री अविनाश पाटील यांना शैक्षणिक दीपस्तंभ ने राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार देऊन केला शैक्षणिक कार्याचा सन्मान…..

धुळे : शिक्षक दिनाच्या निमित्ताने शैक्षणिक दीपस्तंभ ने राज्यभरातील उपक्रमशील शिक्षकांकडून प्रस्ताव मागविले होते. राज्यभरातून शेकडो शिक्षकांनी या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी आपले नामांकन पाठवीले होते. त्यातून ठरावीक शिक्षकांची निवड करण्यात आली. यामध्ये धुळे जिल्ह्यातून दोन शिक्षकांची निवड करण्यात आली. यामध्ये आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक श्री अविनाश पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शिर्डी येथील मानाची साईची शाॅल, मेडल अशा स्वरूपाचे होते. ते टपालाने पाठविण्यात आले. शिक्षण क्षेत्रात उज्वल कामगिरी करून आपली शाळा, विद्यार्थी प्रगत करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविण्यासाठी मोलाची कामगिरी करणाऱ्या, शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य व वैशिष्टय़पूर्ण गुणवत्तेच्या सन्मानार्थ शैक्षणिक दीपस्तंभ ने राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले.

हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्री अविनाश पाटील म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात लाॅकडाऊन च्या काळात शाळेतील विद्यार्थ्यांसोबत इतर विद्यार्थ्यांचाही विचार करून शाळा बंद पण शिक्षण सुरू हा उपक्रम यशस्वीपणे राबविला व त्याचेच हे फलित आहे. विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून स्व. बापूसाहेबांचे शिक्षण विषयक प्रेरणादायी विचार कार्य करायला चालना देतात. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडले, नावीन्याचा नेहमी ध्यास घेणारे संस्थेचे चेअरमन दादासाहेब व अध्यक्ष नानासाहेब, सचिव मा. स्मिता विसपूते, प्राचार्य श्री प्रविण पाटील यांची नियमीत मिळणारी प्रेरणा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी प्रेरित करीत असते. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम अखंड पणे सुरू राहील असे आश्वासित केले.

राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त श्री अविनाश पाटील सरांचे आदर्श शैक्षणिक समुहाचे चेअरमन मा. दादासाहेब धनराजजी विसपूते, संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्रजी विसपूते, संस्थेच्या सचिव मा. स्मिताजी विसपुते, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी. बी. पाटील व संपूर्ण आदर्श परिवारातील सदस्यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button