खिर्डी येथील अ.भा.पाटील माध्यमिक विद्यालय कॉप्यांचा पाऊस : 2 विद्यार्थ्यांसह ,काही शिक्षकांवर
प्रांताधिकारी यांची कारवाई कॉफी मुक्त अभियानाला खो
मोठा वाघोदा ता रावेर प्रतिनिधि मुबारक तडवी
येथील अभिषेक भास्कर पाटील पाटील माध्यमिक विद्यालयात आज 12 वीचा रसायन शास्त्र पेपर चालू असताना अचानक प्रांताधिकारी यांचसह अन्य पथक 11:30 ला अ .भा.पाटील विद्यालय आले कॉपी करत असताना 2 विद्यार्थी व त्या विद्यार्थ्यांना कापी देताना शिक्षकांवर ही कारवाई करण्यात आली.एकदम पथक आल्याने विद्यार्थ्यांमध्ये धांदल उडाली होती.गट शिक्षणाधिकारी ही ठिय्या मांडून बसले असल्याचे चित्र दिसत होते .एवढ्या मोठ्या कारवाई ची परिसरात चर्चा रंगली आहेत.

केंद्र संचालकांची सदर कारवाई बाबत पत्रकारांना माहिती देण्यास टाळाटाळ केली असुन प्रांतअधिकारी यांच्याशी संपर्क केला असता तांत्रिक अडचणी मुळे होवू शकला नाही






