Dhule

पुरस्काराने कार्य करण्याची प्रेरणा मिळते..प्रा. शरद पाटील..मा.आमदार धुळे

पुरस्काराने कार्य करण्याची प्रेरणा मिळते..प्रा. शरद पाटील..मा.आमदार धुळे

उत्तर महाराष्ट्रातील 30 शिक्षकांचा झाला गुरुगौरव पुरस्कार देऊन सन्मान..

अमळनेर 28 नोव्हेंबर महात्मा फुले स्मृती दिवस शिक्षक दिवस साजरा करून
फुले दांपत्याच्या नावाने गुरू गौरव पुरस्कार मिळणे शिक्षकांच्या दृष्टिकोनातून म्हणून भाग्याचे आहे. ओबीसी विद्यार्थी शिक्षक असोसिएशन धुळे यांच्यावतीने उत्तर महाराष्ट्रातून 30 उपक्रमशील शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक,प्राचार्य बंधू आणि भगिनींचा सन्मान केला गेला.
हा सन्मान आपल्या शाळा-महाविद्यालयात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात नेहमीच प्रेरणादायी राहील असे धुळे येथे गरुड वाचनालय ओबीसी विद्यार्थी शिक्षक पालक विकास असोसिएशन धुळे यांच्या वतीने पुरस्कार वितरण प्रसंगी माजी आमदार प्रा. शरद पाटील मार्गदर्शन करतांना बोलत होते.
मॉर्डन को-ऑपरेटिव बँक चाळीसगावचे चेअरमन अशोक खलाणे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले तर गुरूगौरव स्मरणिका प्रकाशन कमलाकर क्षीरसागर अध्यक्ष महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल घोडदे तालुका साक्री, विजय महाजन एरंडोल अध्यक्ष सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ जळगाव, वासुदेव देवरे नगरसेवक शिरपूर ,प्रवीण महाजन नगरसेवक दोंडाईचा, भिलाजी पाटील उपनगराध्यक्ष शिंदखेडा यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
प्रतिमापूजन प्रा. एस के चौधरी संस्थापक माध्यमिक शिक्षक पतपेढी व प्रा. एस एम पाटील संचालक जवाहर सुत गिरणी मोराने धुळे यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी विद्यार्थी शिक्षक पालक विकास असोसिएशन धुळेचे प्रदेशाध्यक्ष विलासराव पाटील होते.
कार्यक्रमात ओबीसी विद्यार्थी शिक्षक पालक विकास असोसिएशनचे सचिव ईश्वर महाजन यांनी प्रास्ताविक केले. ओबीसी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांचा सत्कार केला.
गुरू गौरव पुरस्कार वितरण प्रसंगी प्रा. आशोक खलाने म्हणाले की शिक्षकांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे .सध्याच्या परिस्थितीत शिक्षकांचा मानसन्मान कमी झालेला दिसतोय. येणाऱ्या काळात शिक्षकांनी शाळा परिसरात गावात चांगले वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. विद्यार्थी पालक शिक्षक यांच्यातील सुसंवाद वाढवणे तेवढेच गरजेचे आहे असे सांगत सर्व पुरस्कार्थी
शिक्षक बांधव भगिनींचे त्यांनी अभिनंदन केले.
सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन यांनी गुरू गौरव पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी आपल्या मनोगतात शिक्षण क्षेत्रातील भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे शिक्षण
क्षेत्रावरील विश्वास कमी होत असतांना दिसत आहे. शासन अधिकारी यामध्ये समन्वय नसल्यामुळे संस्थाचालक व शिक्षक भरडला जात आहे छोट्या छोट्या कामांसाठी अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी होतांना दिसत आहे हे बदलायचे असेल शिक्षकांनी आपले प्रामाणिक काम करत कोणत्याही अधिकाऱ्याच्या दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे अध्यापन करावे जे नियमानुसार असेल ते काम होईलच जर होत नसेल तर वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करावा. ओबीसी विद्यार्थी शिक्षक पालक असोसिएशनने सामाजिक बांधिलकी जोपासत उत्तर महाराष्ट्रातील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील डॉक्टरेट, प्राचार्य, शिक्षक बंधू आणि भगिनी यांचा सन्मान करून एक आदर्श निर्माण केला आहे .पुरस्कार बंधू आणि भगिनी निश्चितच आपापल्या क्षेत्रात शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम अधिक जोमाने राबवतील असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी विद्यार्थी शिक्षक पालक विकास असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष विलासराव पाटील म्हणाले की जिल्हा परिषद पुरस्कार देतांना अनेक प्रकारची कागदपत्र जमा करून राजकीय लोकांच्या शिफारसी व आर्थिक वजन दिल्याशिवाय पुरस्कार मिळत नाही परंतु शैक्षणिक क्षेत्रात प्रामाणिकपणे आपल्या शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे शिक्षक बंधू भगिनी अशा पुरस्कारापासून वंचित तर राहतातच ..त्यांचा विचार होत नाही मग अशाच उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांसाठी ओबीसी शिक्षक असोसिएशन 15 वर्षापासून अनेक शिक्षक बांधवांना भगिनींना गुरुगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे याचा मला मनस्वी आनंद आहे .गुरूगौरव पुरस्कार मिळाल्यानंतर शिक्षक बांधवांची जबाबदारी वाढते, पुरस्कार प्रेरणा देतो, प्रेरणेने देश मोठा होतो, आपल्याला आपल्या विद्यालयात काम करण्याचा हुरूप येतो म्हणून सर्व पुरस्कार ती बंधूंना आपल्या शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून फुले दांपत्याचे कार्य पुढे न्यावे असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओबीसी असोसिएशनचे विश्वस्त प्रा.जितेंद्र पगारे यांनी केले तर आभार प्रदर्शन वासुदेव माळी यांनी मानले.
ओबीसी विद्यार्थी शिक्षक-पालक विकास असोसिएशन चे पदाधिकारी संजय खलाणे,रूपेश कुलकर्णी, देवगांव देवळीचे मुख्याध्यापक अनिल महाजन,शिक्षक सुरेश महाजन, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे धुळे जिल्हाअध्यक्ष राजेश बागुल, अखिल भारतीय माळी कर्मचारी सेवा संघाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष जितेंद्र खैरनार ,विभागीय अध्यक्ष नितीन शेलार, नगरसेवक संतोष माळी, भरत रोकडे शिरपूर, सुखदेव जाधव मुंजवाड, भरत महाजन मालेगाव, प्रदीप अहिरे मालेगांव, प्रदीप अहिरे मालेगाव, भानुदास माळी धुळे, गोपाल देवरे धुळे, अतुल सूर्यवंशी नंदुरबार, शंकर खलाणे नेर, देवेंद्र पाटील संपादक धुळे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओबीसी विद्यार्थी शिक्षक पालक असोसिएशनचे पदाधिकारी अखिल भारतीय माळी संघाचे पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button