Faijpur

धनाजी नाना महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

धनाजी नाना महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

सलीम पिंजारी फैजपूर प्रतिनिधी तालुका यावल

फैजपूर- येथील धनाजी नाना महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत जळगाव विभागाच्या आंतर महाविद्यालयीन भारतोलन, शक्तितोलन, शरीर सौष्ठव, योगा, धनुर्विद्या आणि कुस्ती स्पर्धा 2021-22 ह्या यशस्वीरित्या संपन्न झाल्या. कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ अध्यक्षस्थानी जीमखाना समितीचे चेअरमन डॉ सतिश चौधरी हे उपस्थितीत होते. उद्घाटन समारंभ प्रमुख उपस्थितीत प्रा. डॉ. प्रतीभा ढाके, विद्यापीठ क्रीडा मंडळ सदस्य जळगाव विभागाचे सचिव प्रा. डोंगरे, प्रा. डॉ. संजय चौधरी, प्रा. किशोर वाघ एरंडोल, प्रा. डॉ. मुकेश पवार, प्रा. डॉ सचिन झोपे, प्रा. डॉ. बेलोरकर, प्रा. डॉ. आनंद उपाध्याय, प्रा. सुभाष वानखेडे, प्रा. डॉ. चाँद सर, प्रा. डॉ. महेश पाटील प्रा. उमेश पाटील आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गोविंद मारतळे यांनी केले व आभार प्रा. बोदडे सर यांनी मानले.
आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेसाठी पुरुष गटात दहा संघाने व महिला गटात चार संघाने सहभाग घेतला. स्पर्धा यशस्वी संपन्न करण्या करिता तांत्रिक समिती सदस्य म्हणून प्रा. किशोर वाघ व पंच म्हणून श्री. सांगोले सर यांनी काम पाहिले. फ्रिस्टाईल कुस्ती प्रकारात प्रथम- गरूड महाविद्यालय शेदुर्णी, व्दितीय- मु. जे. महाविद्यालय जळगाव, तृतीय- नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव तर महिला गटात प्रथम क्र.- श्री. व्हि. एस. नाईक महाविद्यालय, रावेर व्दितीय क्र. धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर, व तृतीय क्रमांक. गरूड महाविद्यालय शेदुर्णी, आणि ग्रिको रोमन प्रकारात प्रथम क्र.- धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर, व्दितीय क्र. नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव व तृतीय क्रमांक. गरूड महाविद्यालय शेदुर्णी,
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले डॉ. सतिश चौधरी सर यांनी आजच्या अधुनीक युगातील खेळाचे महत्त्व व कुस्ती खेळाचा इतिहास या विषयावर मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
स्पर्धा यशस्वी संपन्न करण्या करिता कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सतीश चौधरी, जळगाव क्रीडा समिती चे सचिव प्रा. चंद्रकात डोंगरे, सहसचिव प्रा. डॉ. पी. आर चौधरी, प्रा. डॉ. संजय चौधरी, प्रा. किशोर वाघ, प्रा. डॉ. मुकेश पवार, प्रा. डॉ. महेश पाटील प्रा. सुभाष वानखेडे प्रा. उमेश पाटील आणि सर्व उपस्थितांचे आभार प्रा. बोदडे सर यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button