Maharashtra

कळंब पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक यांचा मनमर्जी कारभार,वरिष्ठांचे दुर्लक्ष- भाग २

कळंब पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक यांचा मनमर्जी कारभार,वरिष्ठांचे दुर्लक्ष- भाग २

प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना या साथरोगाने थैमान घातले असले तरी कळंब तालुक्यात मात्र दारूचा सुकाळ पहायला मिळत आहे कारण कळंब तालुक्यासह संपूर्ण परिसरात परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री आणि मटका धंदे जोमात सुरू आहे. याकडे कळंब पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक तानाजी दराडे हे कानाडोळा करत असल्यामुळे नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे.

कळंब शहरासह डिकसळ, मोहा,बोर्डा, धानोरा,आंदोरा,आदी ठिकाणी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत खुलेआम देशी,विदेशी दारूची विक्री केली जाते.आणि खुलेआम मटका धंदे सुरू आहेत. कामगार व युवकांना दारूचे व्यसन जडले आहे. दारूला ग्राहकी चांगली असल्यामुळे तसेच आर्थिक उत्पन्नही मोठ्या प्रमाणात मिळत असल्यामुळे अनेक गुंड प्रवृत्तीच्या व्यक्‍तींनी या व्यवसायात उडी घेतली आहे.

मद्यपी मद्य प्राशन करून सार्वजिनक ठिकाणी गोंधळ घालत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत असल्यामुळे रस्त्याने ये-जा करणार्‍या महिला, कामगार, विद्यार्थी व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. महिला व मुलींची छेड काढण्याचा प्रयत्न दारुडे करतात.

मात्र यांच्याविरोधात तक्रार देण्यास कुणी पुढे येत नसल्यामुळे मद्यपींचा त्रास वाढला आहे.आणि जर कोणी तक्रार केलीच तर पोलीस निरीक्षक व कर्मचारी यावर कोणतीही कारवाई करण्याची तसदी घेत नसल्याचे दिसून येत आहे..

कळंब तालुक्यातील युवक दारूच्या आणि मटक्याच्या व्यसनात गुरफटल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. व्यसन करणार्‍यांच्या घरात भांडणाचे प्रकार वाढले असून दारूची चोरटी विक्री थांबविण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नसल्यामुळे नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे. .

दारू विक्री करणार्‍यांची आणि अवैधरित्या मटका घेणाऱ्यांची दहशत असल्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार करण्यास सर्वसामान्य नागरिक धजावत नाही. यामुळे दारू विक्रीचा हा व्यवसाय खुलेआम सुरू आहे. कळंब शहरात व परिसरात अनेक ठिकाणी खुलेआमे अवैध दारूची विक्री जोमात सुरू आहे. शिवाय अनेक हॉटेल, अंडा आम्लेटच्या हातगाड्यांवर रात्री उशिरापर्यंत दारूची विक्री करण्यात येते.

दारू विक्रेत्यां आणि बुकी चालकाकडून कडून ‘मलिदा’ मिळत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात प्रशासन कानाडोळा करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान कळंब येथील नागरिकांनी गावातील अवैध दारू विक्री व मटका धंदे थांबविण्यात यावी, यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावादेखील करण्यात आला होता मात्र यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही..याकडे उस्मानाबाद जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष देणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button