Faijpur

धनाजी नाना महाविद्यालयात आय सी आय सी आय बँक कॅम्पस इंटरव्ह्यू चे यशस्वी आयोजन

धनाजी नाना महाविद्यालयात आय सी आय सी आय बँक कॅम्पस इंटरव्ह्यू चे यशस्वी आयोजन

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल आणि दामोदर नाना चौधरी क्षमता विकास प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आय सीआय सीआय बँक कॅम्पस इंटरव्यूह आयोजित करण्यात आले.
यासाठी पुणे येथील झोहेब शेख , सेंटर मैनेजर यांना आमंत्रित करून पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना बँकेत काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
कॅम्पस इंटरव्ह्यू चे समन्वयक म्हणून उप प्राचार्य प्रा डी बी तायडे व डॉ एस व्ही जाधव यांनी कामकाज पाहिले.
यात उद्घाटन समारंभात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांनी धनाजी नाना नाना महाविद्यालयात अध्ययन अध्यापनात सोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात व करिअरच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात प्रयत्न करत असते. याचाच एक भाग म्हणून कॅम्पस करण्यात आले असून यापुढेही अशा प्रकारचे विविध कॅम्पस आयोजित करण्यात येतील अशी हमी दिली. त्यासोबत कै. लोकसेवक मधुकरराव चौधरी यांचे स्वप्न व वारसा मा श्री शिरिषदादा चौधरी यशस्वीपणे राबवीत आहेत व परिसरातील विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी दर्जेदार शिक्षणातून करिअरच्या विविध संधी उपलब्ध करून देत आहेत याचा उल्लेख करीत प्राचार्य डॉ चौधरी यांनी उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी कला, शास्त्र व वाणिज्य शाखेतील पदवीधर व पदव्युत्तर 85 विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला त्यांच्या मुलाखती, निबंध आणि सायको मेट्रिक परीक्षा नंतर 19 विद्यार्थ्यांचे पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. आयसीआयसीआय बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या मुलाखतीनंतर त्यापैकी 15 विद्यार्थ्यांची ऑनलाईन ट्रेनिंग साठी निवड करण्यात आली. यात प्लेसमेन्ट व ट्रेनिंग सेल आणि दामोदर नाना चौधरी क्षमता विकास प्रबोधिनी चे उपप्राचार्य प्रा डी बी तायडे, डॉ एस व्ही जाधव, विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक डॉ जी जी कोल्हे , डॉ कल्पना पाटील, लेफ्ट डॉ राजेंद्र राजपूत, डॉ रवीकेसुर, डॉ सागर धनगर, डॉ योगेश तायडे, प्रा निखिल वायकोळे यांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन लेफ्ट डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button