Dondaicha

गोरगरिबांची रेल्वे सुरु करा- रेल्वे सल्लागार सदस्य श्री प्रवीणभाऊ महाजन यांची मागणी…

गोरगरिबांची रेल्वे सुरु करा- रेल्वे सल्लागार सदस्य श्री प्रवीणभाऊ महाजन यांची मागणी…

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रोजगार,दळणवळणसाठी, रेल्वे पुर्ववत सुरू होणे गरजेचे….

दोडांईचा : गोरगरिबांना कमी खर्चात पुरवडणारी, भुसावळ-सुरत पँसेजर व ह्या पट्टयावर इतर राज्यात धावणाऱ्या विविध रेल्वे ,दिवाळीच्या पाश्वभुमीवर रोजगार व दळणवळण पुर्ववत पदावर येण्यासाठी सर्व रेल्वे तातडीने सुरू करण्याची मागणी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य श्री प्रवीण महाजन यांनी केन्द्रीय रेल्वे मंत्री श्री पियुशजी गोयलसह संबंधित लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र व मेलद्वारे केली आहे.

श्री प्रवीण महाजन यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या संकटकाळात सामुहिक प्रादुर्भाव होऊ नये. म्हणुन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशभरात दिनांक २४ मार्चपासून लाँकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे देशातील सर्व आर्थिक ,उद्योगीक ,शासकीय , खाजगी तसेच दळणवळणाच्या साधनांसह संपुर्ण अर्थचक्र थांबले होते. त्याचे दृष्य स्वरुपात परिणाम आपण सर्व अनुभवत आहोत. त्यात जगातील सर्वाधिक कमी संसर्ग भारतीय उपखंडात झाला. मृत्युचे प्रमाण देखील जागतीक टक्केवारीपेक्षा निम्मे आहे .सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने देशभरात अनलाँकची प्रक्रीया सर्वत्र जोरात सुरु आहे. सर्व उद्योग व्यवसाय पुर्ववत सुरु होत आहेत. भारतात दळणवळणाच्या साधनांमध्ये सर्वाधिक गोरगरीब, मध्यम वर्गीयांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे व सुरक्षित प्रवास म्हणून रेल्वे वाहतूककडे पाहिले जाते.

खानदेशातील जिवन वाहिनी असलेली सुरत – भुसावळ पँसेजर (ताप्ती लाईनगाडी ) हि लाखों खान्देशवासीयांसह, उत्तर भारतातील लाखो कामगार आपल्या कुटूबांच्या उदरनिर्वाहासाठी रोजगारा निमित्त गुजरात राज्यात वास्तव्यास आहेत. वर्षाकाठी हि सर्व मंडळी आपल्या घरी दिवाळी सण, त्याचप्रमाणे छट पुजा सण साजरा करण्यासाठी जातात. तरी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने ताप्ती लाईन गाडी वरील सर्व प्रवाशांन खातिर, रेल्वे प्रशासनाने सर्व सुरक्षिततेची काळजी घेऊन सुरु करावीत अशा आशयाचे निवेदन केंद्रीय रेल्वे मंत्री श्री पियुषजी गोयलसाहेब ,माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा धुळे लोकसभेचे खासदार डॉ श्री सुभाष भामरेसाहेब , नंदुरबार लोकसभेच्या खासदार डॉ हिनाताई गावीत ,मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक श्री सुनिलकुमार चर्चगेट मुंबई ,पश्र्चिम रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक श्री विवेककुमार गुप्ता, भुसावळ आदींना भावनिक पत्र व मेलद्वारे रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य तथा भाजपाचे शहराध्यक्ष श्री प्रविण महाजन यांनी मागणी केली आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button