Dondaicha

भाजपा दोंडाईचातर्फे संविधान दिन साजरा महामानव बाबासाहेब डाँ.आबेंडकर यांना माल्यार्पण व अभिवादन..

भाजपा दोंडाईचातर्फे संविधान दिन साजरा महामानव बाबासाहेब डाँ.आबेंडकर यांना माल्यार्पण व अभिवादन..

असद खाटीक दोंडाईचा

Dondaycha : दोडांईचा येथे शहर भाजपातर्फे आज दिनांक २६ नोव्हेंबर रोजी भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधान दिवस साजरा करण्यात आला.याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष श्री प्रविण महाजन, उपनगराध्यक्ष श्री रविंद्र उपाध्ये, भाजपा सरचिटणीस श्री कृष्णा नगराळे , श्री जितेंद्र गिरासे ,श्री भरतरी ठाकुर,माजी नगरसेवक श्री रामभाऊ माणीक ,श्री प्रफुल्ल साळुंके ,श्री केदारनाथ कवडीवाले आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमास सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच भाजपा अनुसुचित जातीचे अध्यक्ष श्री रवि अहिरे यांनी संविधान वाचुन इतरांनी त्यांच्यामागे म्हणुन अभिवादन केले .

यावेळी भाजपा शहराध्यक्ष श्री प्रविण महाजन यांनी सांगितले की ,डॉ. बाबासाहेब यांनी संविधानाचा मसुदा तयार करतांना ,जगातील सर्व लोकशाही देशांचा संविधानाचा अभ्यास करुन भारताचे संविधान लिहिले. त्यासाठी त्यांनी २ वर्ष ११ महिने १८ दिवस अहोरात्र मेहनत घेत.स्वअक्षरात लिहुन पुर्ण केले.१५ नोव्हेंबर १९४९ सुपूर्द करुन २६ नोव्हेंबर १९४९ला भारतीय संसदेने स्विकारले व त्याची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासुन देशात झाली. तसेच आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी २६ नोव्हेंबर २०१५ पासुन संपुर्ण देशभरात संविधान दिवस साजरा करण्याचे घोषीत केले .डॉ बाबासाहेब यांनी संविधानात न्याय व्यवस्था , प्रशासन व कायदेमंडळाच्या माध्यमातून भारत देशाची लोकशाही जगातील सर्वोत्तम लोकशाही निर्माण होईल असे संविधान लिहिले. त्यात देशाची अखंडता , सार्वभौमत्व,समता , एकात्मता इ गोष्टींचा समावेश करुन देशप्रेमाची भावना रुजवुन लिंगभेद ,जातीभेद , नष्ट करुन सर्वसामान्य नागरीकांना मुलभुत अधिकार इ उद्दीष्टे समोर ठेऊन लिहलीत . उपनगराध्यक्ष श्री रविंद्र उपाध्ये यांनी सांगितले की, आपल्या देशाची लोकशाही हि मजबुत लोकशाही असुन आपण सर्व देशवासीयांना वरदान आहे .श्री कवडीवाले ,श्री मक्कन माणीक ,श्री कृष्णा नगराळे आदी मान्यवरांनी आपले विचार यावेळी मांडले.

कार्यक्रमास भाजपा शहर अध्यक्ष तथा पाणी पुरवठा सभापती,श्री प्रविण महाजन, उपनगराध्यक्ष श्री रवींद्र उपाध्ये, भाजपा सरचिटणीस नगरसेवक श्री कृष्णा नगराळे, आरोग्य सभापती श्री जितेंद्र गिरासे, भाजपा सरचिटणीस, नगरसेवक श्री भरतरी ठाकुर, माजी नगरसेवक श्री रामभाऊ माणिक, श्री.रवींद्र महाले,श्री. सचिन नगराळे, भाजपा दलित आघाडी प्रमुख श्री रविंद्र अहिरे, भाजपा सोशल मीडिया प्रमुख श्री मनोहर कापुरे, श्री प्रवीण आगळे,श्री मक्कन माणिक,श्री गोविंदा नगराळे, व्यापारी असोसिएशनचे श्री राहुल कवाड, श्री कवडीवाले सर, श्री प्रफुल्ल साळुंखे,श्री भुपेंद्र मोहिते, श्री अजय बिरारे, सागर नगराळे, श्री मुकेश नगराळे, श्री.दादाभाई कापुरे, श्री धीरज कापुरे, श्री आनंद माणिक, श्री मिलिंद नगराळे,श्री शिवा नगराळे, श्री दिलीप नगराळे, श्री.योगेश लांडगे,श्री. पप्पू तिरमले, श्री.टायगर धनगर, श्री धनराज करणकाळ, श्री सिद्धार्थ रामराजे, श्री प्रफुल्ल नगराळे आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button