Dondaicha

दोंडाईचा येथे कपास खरेदीच्या अभिषेक जिनींगला भिषण आग उपनराध्यक्ष रवी उपाध्ये यांचे आगीत पंचवीस लाखाच्या आत नुकसान…

दोंडाईचा येथे कपास खरेदीच्या अभिषेक जिनींगला भिषण आग उपनराध्यक्ष रवी उपाध्ये यांचे आगीत पंचवीस लाखाच्या आत नुकसान…

नगरसेवकांसोबत नुकसानीची सरत्या वर्षातील चौथी घटना….

असद खाटीक दोंडाईचा

Dondaycha : येथील नगरपालीकेचे विद्यमान उपनराध्यक्ष श्री रवीन्द्र उपाध्ये यांच्या धूळे रोडवर असलेल्या अभिषेक जिनींगमध्ये आज सकाळी अचानक कपाशीच्या गठानांना आग लागली आहे. यावेळी वेळेवर कामावर असलेल्या कर्मेचाऱ्यांना आग लागल्याचे प्रथम लक्षात आले. त्यांनी वेळ न गमावता लगेच जिनींगचे मालक, उपनगराध्यक्ष श्री रविन्द्र उपाध्ये यांना घटनेची माहिती दिली. त्यांनीही लगेच दोंडाईचा फायर फायटरची मदत घेतली, व काहीवेळात आगीवर लगेच नियत्रंण मिळवले. तरी हया आगीत कपाशीचे पंचवीस लाखाच्या आत नुकसान झाल्याचा अंदाज उपनगराध्यक्ष श्री रवीन्द्र उपाध्ये यांच्यासह उपस्थितांनी लावला असल्याचे लोकांमध्ये बोलले जात आहे. याबाबत उशिरापर्यंत दोंडाईचा पोलीस स्टेशनमध्ये अग्नी उपद्रव्यापची घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

दोंडाईचा पालीकेचे उपनराध्यक्ष श्री रवींद्र उपाध्ये यांचे धुळे रोडवर कपाशी खरेदीचे अभिषेक जिनींग अँन्ड प्रोसेसिंग केन्द्र मागील तेरा वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी नियमित कार्योन्वित आहे. ह्यावर्षीही करोना पाश्वभुमीवर उशीरा का असेना सरकारच्या आदेशाने खाजगी कपास खरेदी केन्द्रात शेतकऱ्याची कपाशी सरकारी भावात खरेदीचे (सी.सी.आय.) केन्द्र सुरु करण्यात आले. म्हणून येथील अभिषेक जिनींगमध्येही शेतकरी आपली कपाशी विक्री करण्यासाठी चांगली लाईन लावून ऊभे रहात आहे.

आज ह्या अभिषेक जिनींगमध्ये सकाळी अकरा सव्वा अकराच्या सुमारास कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना कपाशीच्या गठानींना आग लागल्याचे प्रथम लक्षात आले. त्यांनी लगेच जिनींग मालक व उपनराध्यक्ष श्री रवींद्र उपाध्ये यांना घटनेची माहिती दिली. रवी उपाध्ये यांनी लगेच दोंडाईचा, शिदंखेडा, शहादा येथील अग्नी शमन दलाला माहिती देत,ताबडतोब पाचारन करण्यास सांगितले. यावेळी पत्र्यांच्या शेडमध्ये प्रत्येकी एकशे संतर किलो वजनाचे दीडशे ते दोनशे गठांन लावलेले होते.त्याची अंदाचे वीस हजार रूपये किमंत धरली जात आहे. जे अग्निशमन दल येणाच्या अगोदर भस्म झाले. तरी स्थानिक फायर फायटर वेळेवर आल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले.यावेळी घटनास्थळी दोंडाईचा नगरपालीकेचे बांधकाम सभापती श्री निखील राजपूत, भाजपा शहराध्यक्ष श्री प्रवीण महाजन, नगरसेवक श्री चिरंजीव चौधरी, कुष्णा नगराळे आदी उपस्थित होते.

ह्या वर्षी जसे देशावर करोनाचे संकट थैमान घालत आहे. तसे करोना काळात येथील अनेक नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांनी लोकांना दिसेल अशा, उघळ्या डोळ्यांनी, सढळ हातांनी, गावातील गोर-गरिबांना अनेक दिवस अन्नधान्य सह इतरही वस्तूंची अनमोल मदत केली आहे. याकाळात अक्षरशः स्थानिक लोकप्रतिनिधींकडून मदतीचा पाऊस धो,धो गरिबांवर पडत होता. जे गरीब आजही यांचे उपकार विसरू शकत नाही आहे. तरी मागील दोन तीन महिन्यांनपासून याच्यांतीलच असतील असे दानशुर नगरसेवक एकाची तीन लाखाची बूलेट चोरली गेली. दुसऱ्या घटनेत एक स्विकूत नगरसेवक यांच्या मीलमधुन अक्षरशः चोरांनी बासमती तांदुळाचे ष्यांनऊ कट्टे रात्रीच्या अंधाऱ्यात राजेरोसपणे चारचाकी गाडी लावून वाहले. तिसऱ्या घटनेत माजी शिक्षण सभापती व नगरसेवक यांच्या धुळे रोडवरीलच गँस गोडावूनवरून वीस लाखाच्या आतील भरलेले गँस सिलेंडर, दोन ट्रक माल लोड होईल. ऐवढा माल वाहून नेण्याची हिमंत ठेवतात, व आज पुन्हा कुत्रीम आघाताने एका दानशुर नगरसेवकाच्या जिनींगवर कपाशीला आग लागुन वीस ते पंचवीस लाखाचे नुकसान होते,आदी घटना दोंडाईचाकरांच्यासाठी दु:खदायी आहेत. म्हणून वरील नगरसेवक लोकासोबत झालेल्या नुकसानीबाबत गावात सहानभूती दाखवत,लोक हळहळ व्यक्त करत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button