Amalner

Amalner:अमळनेरात शिवसेनेला खिंडार…तालुक्यातील अनेक पदाधिकारी शिंदे गटात दाखल..ना. गुलाबराव पाटील यांनी केले स्वागत

Amalner:अमळनेरात शिवसेनेला खिंडार…तालुक्यातील अनेक पदाधिकारी शिंदे गटात दाखल..ना. गुलाबराव पाटील यांनी केले स्वागत

अमळनेर शिवसेनातून शिंदे गटात दाखल होणार्‍या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतच आहे. आज ना. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून अमळनेर तालुक्यातील पदाधिकार्‍यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. ना. पाटील यांनी पदाधिकार्‍यांचे स्वागत करत आगामी वाटचालीसाठी तयारीला लागण्याचे निर्देश दिलेत.*

जळगाव जिल्ह्यातील शिवसेना पक्षाचे चार आणि एक समर्थक अशा पाचही आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून त्यांची सोबत घेतली आहे. ठिकठिकाणच्या शिवसेना पदाधिकार्‍यांनी देखील या आमदारांच्या सोबत शिंदे गटात सहभागी होण्यास प्रारंभ केला आहे. यात विशेष करून राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून अनेक पदाधिकारी शिंदे गटात सहभागी होत आहेत. यात अमळनेर तालुक्यातील शेकडो पदाधिकार्‍यांचा शिंदे गटात प्रवेश झाला आहे.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी आगामी काळातील विविध निवडणुकांच्या पार्श्‍वभूमिवर, सर्व पदाधिकार्‍यांनी आजपासूनच कामाला लागलावे असे आवाहन केले. राज्यात आता शिंदे सरकार असून ते ग्रामविकासासाठी लागणारा निधी मिळवून देण्यासाठी कोणतीही कमतरता पडू देणार नसल्याचे ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी आवर्जून नमूद केले.

कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक महेश देशमुख , माजी नगरसेवक संजय पाटील(भूत बापू) , सुन्दरपट्टीचे लोकनियुक्क्त सरपंच सरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला.
शिवसेनेत प्रवेश केलेल्या पदाधिकारींमधे झाड़ी येथील युवा नेतृत्व गुणवंत बापूराव पाटील,माजी सरपंच सौ.सुनीता नितिन पाटील, माजी सरपंच तापीबाई एकनाथ भील,ग्रामपंचायत सदस्या सौ.कलाबाई वसंत पाटील, ग्रा.सदस्या सौ.शुभांगी जगदीश पाटील ,ग्रा.प.सदस्य नितिन अभिमन पाटील, माजी ग्रा.प.सदस्य दिनेश सुभाष पाटील, पुंडलिक तानकु सोनवणे, मल्हारी रामसिंग सोनवणे, जगदीश विश्र्वास पाटील, सौ.हर्षा गुणवंत पाटील, सौ.सुनंदाबाई राजेन्द्र बागुल, अशोक देविदास पवार,सौ.सुवर्णा मल्हारी सोनवणे,सुरेश हिरामण बागुल,महेंद्र राजेंद्र बागुल,हेडाव्याचे संजय बंसी पाटील, अमळनेर शहरातील माळी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते साखरलाल माळीसर , राजेश शालिग्राम माळी यांचा समावेश होता.मा.गुलाबभाउंच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तालुक्यात शिवसेनेचा विस्तार करू असे यावेळी समस्त पदाधिकरिंनी स्पष्ट केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button