Dondaicha

दोंडाईचा येथे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गोटे येणाच्या पाश्वभुमीवर, संवेदनशील वातावरण. भारतीय जनता पार्टीही,एकजुटीसाठी गढीवर सरसावली,निवेदन न देता फुलहार अर्पण करण्यात आले..

दोंडाईचा येथे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गोटे येणाच्या पाश्वभुमीवर, संवेदनशील वातावरण. भारतीय जनता पार्टीही,एकजुटीसाठी गढीवर सरसावली,निवेदन न देता फुलहार अर्पण करण्यात आले..

गावात प्रो.एसपी श्री पंकजजी कुमावत यांच्या अधिपत्याखाली कडक बंदोबस्त,गाव वेठीस, राजकीय मंडळी ऐटीत..

असद खाटीक दोंडाईचा

दोंडाईचा : दोंडाईचा राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गोटे यांच्या विरोधात टाकरखेडा ता.शिदंखेडा येथील माजी मंत्री रावल यांच्या दौलतगड ह्या फार्महाऊसवर बेकायदा प्रवेश केल्या प्रकरणी दिनांक ११ डिसेंबर रोजी दोंडाईचा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली होती. त्या अनुषंगाने आज दिनांक १८ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी पक्षाचे अनिल गोटे आपली भुमिका मांडण्यासाठी दोंडाईचा पोलीस स्टेशनला दुपारी २.०० भेट देण्याचे नियोजित केले. त्या पाश्वभुमीवर आज गावात जिल्हयाभरातील विविध पोलीस अधिकाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला. यावेळी प्रो.एसपी श्री पंकज कुमावत यांनी परिस्थितीवर विशेष पकड निर्माण केली.

तसेच आज दुपारी २.०५ मिनीटांच्या सुमारास माजी आमदार अनिल गोटे यांनी दोंडाईचा पोलीस स्टेशनचे प्रो.एसपी कुमावत यांची भेट घेत घटनेच्या दिवशीची झालेली भुमिका स्पष्ट केली.तसेच पुढे ग्रामपंचायत निवडणूक असल्या कारणाने वेळेवर उपल्बध होऊ शकणार नाही.म्हणून आज स्वतः हून जातीने हजर झालो आहे असे सांगितले. यावेळी प्रो.एसपी यांनी सांगितले की, आपल्यावर गुन्हा दाखल आहे. परंतु आज आपल्याला बोलविण्यात आलेले नाही आहे. कायद्याने नोटीस देवून, ज्या दिवशी आपल्याला बोलविण्यात येईल. त्यादिवशी आपण हजर व्हावे, असा भेटीतील सुर निघाला.

दुसरीकडे भारतीय जनता पार्टीकडून दुपारी १२.०० कार्यकर्त्याची गढीवर बैठक बोलविण्यात आली व दोंडाईचा पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात येणार होते. मात्र त्यांनी अनिल गोटे यांची पोलीस स्टेशनला भेट झाल्यावर फक्त शिवाजी महाराज यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास मोठ्या संख्येने पायी चालत,उपस्थित राहत फुष्पहार घालून बैठक संपन्न केली व कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी मोर्चा नेला. ह्या सर्व परिस्थितीत गाववाले व व्यापारी यांची चांगलीच आर्थिकदृष्ट्या मारली गेली. मात्र राजकीय मंडळी व राजकीय वातावरण चांगलेच ऐटीत दिसले.

तसेच दिवसभर आज अनिल गोटे व रावल गट यांच्या आपसातील कलगीतुरामुळे गाव व गावातील लहान मोठे व्यवसायिक यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले होते. म्हणजे गावात ग्राहकी तर मुळीच नव्हती.पण जागोजागी जो मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता. त्यामुळे गावात भितीयुक्त वातावरण निर्माण झाले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button