Dindori

श्रीमंत युवराज्ञी छ. संयोगिता राजे भोसले यांनी शिवचरित्रकार प्रा. सोपान वाटपाडे यांच्याकडून जाणून घेतला नासिकचा स्वराज्याच्या पाऊलखुणांचा इतिहास..

श्रीमंत युवराज्ञी छ. संयोगिता राजे भोसले यांनी शिवचरित्रकार प्रा. सोपान वाटपाडे यांच्याकडून जाणून घेतला नासिकचा स्वराज्याच्या पाऊलखुणांचा इतिहास..

सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी

दिंडोरी-
स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी महाराज यांना लाभलेल्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात त्यांनी प्रचंड संघर्ष करत स्वराज्य उभे केले. या स्वराज्याच्या पाऊलखुणा नाशिक मध्ये काय आहेत याची उत्सुकता राजघराण्यातील वंशजांना होती. स्वराज्याच्या जनस्थान म्हणजे नाशिक मधील इतिहासाच्या पाऊलखुणा या विषयावरती नाशिकचे शिवचरित्र लेखक प्रा. सोपान वाटपाडे यांच्याकडून जाणून घेतला.
नुकत्याच नाशिक दौऱ्यावरती आलेल्या छ. शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज युवराज श्रीमंत छ. संभाजीराजे भोसले यांच्या सुविद्य पत्नी श्रीमंत छ. युवराज्ञी संयोगिता राजे भोसले यांनी नासिक पंचक्रोशीत गेली अनेक वर्ष गडकोट किल्ले, ऐतिहासिक वस्तू, ऐतिहासिक साधनांचा सखोल असा अभ्यास करणारे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतील सध्या श्री. छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद, नाशिक येथे उपमुख्याध्यापक या पदावर कार्यरत असलेले निफाडचे भूमिपुत्र प्रा‌. सोपान वाटपाडे यांच्याकडून जाणून घेतला. त्यांनी गेले अनेक वर्ष शिवचरित्राचा अभ्यास केला आहे. अनेक गडकोट किल्ले, ऐतिहासिक वास्तू, ऐतिहासिक साधने येथे भेटी दिल्या. तेथील स्थानिक पातळीवरील इतिहास जाणून घेतला. शिवछत्रपतींचे वंशज तसेच सेनापती, सरदार, मावळे यांच्याही अनेक वंश ज्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या. त्यांच्याकडून स्वराज्याचा ज्वाजल इतिहास जाणून घेण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न केला. त्यांनी शिवचरित्राच्या अभ्यासाबरोबरच जनकल्याण राजा छत्रपती शिवराय या शिवचरित्र पुस्तकाची अतिशय सुंदर मांडणी केलेली आहे. सखोल लिखाण केले आहे. जनसामान्यांत सदर चरित्र पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले सोपान वाटपडे यांनी आपल्या ग्रामीण शैलीमध्ये मांडलेले हे शिवचरित्र खूपच अभ्यासपूर्ण व लोकप्रिय ठरले आहे. अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या त्यांच्या या शिवचरित्राचा आधार घेत युवराज्ञी छ. संयोगिता राजे भोसले यांनी त्यांच्याकडून स्वराज्याच्या पाऊलखुणा अंतर्गत नाशिक मधील शिवछत्रपतींचे वास्तव्य, कार्य, कर्तुत्व व लढाया यांचा इतिहास संदर्भासहित जाणून घेतला. दि. १७ ऑक्टोबर १६७० या दिवशी दिंडोरी येथे रणतळं येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून केलेली मुघलांचा सरदार दाऊद खान कुरेशी बरोबर ची लढाई आणि त्यातून मिळविलेला विजय तसेच ३१ डिसेंबर १६६३ रोजी सुरतेवर छापा टाकण्यासाठी जात असतानाचा मार्ग हा त्यांनी त्र्यंबकेश्वर जव्हार मार्गे घनदेवी असा निवडला होता. त्याच अनुषंगाने ३१ डिसेंबर १६६३ रोजी श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आपल्या पाच हजार सैन्या सोबत मुक्काम केला. पंडित श्री ढेरगे शास्त्री पुरोहित यांनी त्र्यंबक रायाच्या मंदिरात महापूजा केली. तेथून ते कोळवणात उतरले. कोळी राजांनी देखील एक भव्य कमान उभारून त्यांचे जंगी स्वागत केले. दुसरा प्रसंग काही इतिहासकारांच्या मते शहाजीराजे मुघलांकडे असताना जुन्या नाशिक येथील आत्ताची मशिद असलेल्या ठिकाणी मुघलांचा एक सरकारी भव्य वाडा होता. तेथे शहाजीराजांचे काही दिवस वास्तव्य होते. याच वास्तव्यादरम्यान बालपणी शिवछत्रपती नाशिक मध्ये राहून गेल्याची नोंद इतिहासात सापडते. तसेच जिजाऊ साहेबांचे चुलत दिर खेळोजी राजे भोसले यांची पत्नी पद्मावती हि नववधू देवदर्शना साठी नाशिक येथे पंचवटीत रामकुंड परिसरात आली असताना सुरतच्या सुभेदाराने पळवून नेल्याची घटना सन १६२९ मध्ये घडली होती. त्याच बदल्याचा एक भाग म्हणून शिवछत्रपतींनी सुरतवर दोनदा स्वारी केल्याचे अनुमान लावता येते. सुरतते वरील दुसऱ्या छाप्याच्या वेळेस महाराज राजगडावर परत येत असताना बुऱ्हानपूर वरून मुघल सरदार दाऊद खान कुरेशी हा महाराजांवरती चालून आला. कांचन बारी मध्ये महाराजांना गाठण्याचा त्यांनी निश्चय केलेला असताना महाराजांना ही खबर आपल्या गुप्तचर विभागाकडून मिळताच त्यांनी आपला मार्ग बदलविला. त्यांनी वणी- दिंडोरी, नाशिक विश्रामगड मार्गे जाण्याचे ठरविले. त्याच वेळेस दाऊद खान टप्प्यात आलेला असताना त्यांनी आपल्याबरोबर असलेले सर्व साहित्य पुढे पाठवून दिले. स्वतः मात्र दिंडोरीच्या नजीक रणतळा येथे शत्रूची वाट पाहत दबा धरून बसले. शेवटी दाऊद खान कुरेशी, इखलासखान आणि महाराजांच्या सैन्याची गाठ रणतळे येथे १७ ऑक्टोबर १६७० रोजी पडली. घनघोर युद्ध झाले. या लढाईत महाराज स्वतः हातात तलवार घेऊन लढले. दाऊद खानचा येथे मोठा पराभव झाला. त्याला पळता भुई थोडी झाली. तो सरळ खानदेशात निघून गेला. महाराज पट्टा किल्ला मार्गे राजगडावरती सुखरूप पोहोचले…. स्वराज्याच्या पाऊल खुणांचा नाशिक मधील इतिहास अतिशय जाजल्य आहे. मग ती कांचन मंचन येथील लढाई असो साल्हेर- मूल्हेर येथील लढाई असो किंवा शिवछत्रपतींचा शूर मावळा रामजी पांगेरे यांचा संघर्ष व स्वराज्यासाठी केलेले बलिदान असो या सर्व इतिहासाचे शिवछत्रपतींचे वंशज यांना नेहमी आकर्षण राहिलेले आहे. आपल्या पूर्वजांचा दैदीप्यमान पराक्रमी इतिहास जाणून घेण्याची राजघराण्याच्या वंशजांना नेहमीच ओढ असते. आज नाशिकमध्ये प्रा. सोपान वाटपाडे यांनी त्यांच्याकडे असलेल्या शिवचरित्राच्या अभ्यासातील पुरावे व संदर्भानुसार आपल्या अल्पमतीप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. येणारे शिवजयंती निमित्त सर्व शिवभक्तांना शिवमय शुभेच्छा!!! जय शिवराय …. सोपान वाटपाडे, शिवचरित्राचे अभ्यासक तथा शिवचरित्र लेखक… नाशिक.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button