Motha Waghoda

क्रीडा, क्रीडांगण आणि स्पर्धा हाच खेळाडूंचा कणा- सरपंच मुबारक तडवी

क्रीडा, क्रीडांगण आणि स्पर्धा हाच खेळाडूंचा कणा- सरपंच मुबारक तडवी

प्रविण शेलोडे /निंभोरा
तरुण नवयुवकांनी मैदानी खेळ खेळण्याचा सराव नक्कीच करावा जेणेकरून शारीरिक मजबुती सोबतच बौद्धिक क्षमता वाढण्यास मदत होते आणि लहानपणापासून मैदानी खेळाच्या सरावामुळेच शारिरीक विकास शक्य असल्याचे ते म्हणाले.मोठे वाघोदा येथे श्री स्पोर्ट्स क्लबच्या प्रथम वर्धापनदिनी कबड्डी सामनासह विविध कार्यक्रम संपन्न.

रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथे आज श्री स्पोर्ट्स क्लबचा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला.गावातील क्रीडा प्रेमी युवक या सर्वांनी एकत्रित येऊन श्री चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळ ,गावातील प्रतिष्ठित नागरिक व सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने गेल्या वर्षी दिनांक श्री स्पोर्ट क्लबची स्थापना केली होती.श्री स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून कब्बडी, रंनिग, गोळाफेक विविध खेळ व शारीरिक व्यायामाचे प्रकार शिकवले जातात पुर्व परिक्षा तयारी अभ्यासिका यामाध्यतुन मुलांची शारीरिक तयारी सोबतच स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जाते जेणे करून येथे नवयुवक मुलांना विविध मैदानी खेळ, शारीरिक व्यायाम,व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी अभ्यासिकेद्वारे अंगी असलेल्याकला गुणांना व्यासपिठ मिळावा व प्रशिक्षित होऊन भारतीय संरक्षण सेवेत,पोलीस भरती व इतर भरतीसाठी तयारी केली जाते.याठिकाणी एकुण 50 विद्यार्थी सराव करतात खेळ व अभ्यासा सोबत त्यांना व्यसनांपासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन केले जाते श्री स्पोर्ट क्लबच्या स्थापनेपासून आज पर्यंत कब्बडी स्पर्धेत एकूण जिल्हास्तरीय 1 तालुकास्तरीय 5 अश्या स्पर्धेत सहभाग घेऊन तालुका स्तरीय 4 स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.श्री स्पोर्ट क्लबचा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निवड सराव सामन्यात क्लबचा खेळाडू हितेश सुपे याची निवड झाली होती मात्र कोरोनामुळे या स्पर्धा रद्द झाल्या.

पुढे श्री स्पोर्ट कल्बच्या माध्यमातून अनेक खेळाडू घडवण्याचा मानस आहे श्री स्पोर्ट क्लबला श्रीकांत महाजन सर,रावेर, गणेश भोई वरणगाव यांचे मार्गदर्शन लाभले व प्रशिक्षण म्हणून विशाल इंगळे,निखिल पाटील,लखन तायडे हे कार्य पाहिले आज या श्री स्पोर्ट क्लब स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाला त्यानिमित्ताने वर्धापन दिनानिमित्ताने आज क्रीडा ग्राऊंडवर विविध मान्यवर, क्रिडा शिक्षक व क्रीडाप्रेमी यांच्या उपस्थितीत साजरा झाला.त्यावेळी सराव ही घेण्यात आला.प्रथम हनुमंत रायाचे प्रतिमेचे पुजन करण्यात आले.कार्यक्रमाचे उत्घाटन सरपंच मुबारक तडवी यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच कबड्डी सराव विजेत्यांना प्रगतीशील शेतकरी प्रफुल्ल महाजन यांच्या हस्ते ट्राँफी देण्यात आली.यावेळी उपसरपंच लक्ष्मीकांत चौधरी.ग्रा पं सदस्य कालु मिस्तरी.स्वप्निल पवार. पत्रकार कमलाकर माळी. सुरेंन्द्र न्हावी.जीवन कापसे.राहुल महाजन.सुरेश कापसे.सुनील इंगळे.संतोष पुरभी.तसेच गावातील.ग्रामस्थ उपस्थित होते. कबड्डी सामना मैदानाचे फित कापून स्पर्धेस प्रारंभ करतांना सरपंच मुबारक तडवी,माजी सरपंच कालू मिस्तरी, प्रगतशील शेतकरी प्रफुल्ल महाजन, उपसरपंच लक्ष्मीकांत चौधरी, पत्रकार कमलाकर माळी, सदस्य सुरेश कापसे, सुरेंद्र शिरनामे सह आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button