Shirpur

कोडीद परिसरातील मोबाईल नेटवर्क समस्या सोडवा व जिओ (JIO)नेटवर्क असणारे टॉवर तात्काळ उभे करावे अन्यथा तीव्र आंदोलन – जयस शिरपूर.

कोडीद परिसरातील मोबाईल नेटवर्क समस्या सोडवा व जिओ (JIO)नेटवर्क असणारे टॉवर तात्काळ उभे करावे अन्यथा तीव्र आंदोलन – जयस शिरपूर.
राहुल साळुंके धुळे
धुळे : जय आदिवासी युवा शक्ती (जयस)शिरपूर, अन्य समविचारी संघटना व परिसरातील नागरिकांनी स्वाक्षरी असलेले निवेदन मेल द्वारे तक्रार व मागणी दाखल.
शिरपूर तालुक्यातील आदिवासी बहुल कोडीद परिसर व परिसरातील नागरिकांना मागील काही महिन्यांपासून सर्वच एअरटेल, व्होडाफोन, आयडिया, BSNL तसेच परिसरात सर्वाधीक व्होडाफोन चे ग्राहक असून मागील दोन महिन्यांपासून वीक नेटवर्क मूळे नागरिकांना आर्थिक व्यवहार करणे,ऑनलाईनची कामे तसेच विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास अश्या एक ना अनेक समस्यांमुळे संपूर्ण परिसरातील नागरिक त्रस्त आहेत सदरील कंपनीचे मोबाईल नेटवर्क समस्येमुळे खूपच अडचणीचा सामना करावा लागतोय अनेक रोषाला सामोरं जावं लागतंय त्यामुळे कोडीद परिसरातील सर्वच क्षेत्रातील तरुण, नागरिक, वैद्यकीय, शासकीय, प्रशासकीय, राजकीय पदाधिकारी ह्यांनी संताप व्यक्त केला आहे अन् आतातर संताप अनावर आहे.
सध्या भारतभर पसरलेल्या कोवीड-१९चां प्रादुर्भाव बघता सगळीकडे लसीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु केले आहे अन् हे काम ऑनलाईन रजिस्ट्रेशन शिवाय शक्य नाहीये.
तालुका आरोग्य विभाग शिरपूर अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडी, उपकेंद्र कोडीद, उपकेंद्र मालकातर, उपकेंद्र फत्तेपूर, उपकेंद्र बूडकी, उपकेंद्र न्यू बोराडी येथे लसीकरण युद्धपातळीवर सुरू आहे पण ऑनलाईन रजिस्ट्रेशन साठी लागणारे अपूर्ण अथवा कमी गती स्पीड असलेले सर्वच कंपनीचे नेटवर्क ऑफ असणे, स्पीड कमी असणे ह्यामुळे खूप मोठी अडचण येते व संताप अनावर होणे साहजिकच आहे.
तसेच एखादा अत्यावश्यक कॉल लावायचा असेल तर तो कोणत्याही वरील नेटवर्क चा असो तो कॉल कधी कधी अर्धा अर्धा तास लागत नाही अन् लागला तर इकडचा वा तिकडचा आवाज येत नसतो त्यामुळे बरेच अत्यावश्यक सेवा ठप्प पडतात व ह्या नेटवर्क च्या समस्येमुळे अम्बुलंस वेळेवर न आल्यामुळे जीव जाण्याचे नाकारता येत नाही ह्याची पूर्ण जबाबदारी ह्या मोबाईल नेटवर्क कंपन्यांची आहे.
शिवाय एअरटेल, व्होडाफोन, आयडिया, BSNL, जिओ ह्यांचे ग्राहक सेवा केंद्रातील तक्रार नंबर वर शेकडो वेळा तक्रार केली असता कोणताही प्रतिसाद नाहीये, उडवाउडवीची उत्तरे भेटतात, ही लोक अथवा ह्या सर्वच नेटवर्क कंपनी ग्राहकांची बाजू का ऐकत नाहीये का आदिवासी बहुल परिसरात फक्त पैसे कमवायची काम करतात असा प्रश्न पडतो.
ह्या आधुनिक युगात सोशल मीडिया शिवाय जनजीवन विस्कळित होते अनेक शासकीय, निमशासकीय, वैद्यकीय तसेच महत्वाची ऑनलाईन मीटिंग ही मोबाईल नेटवर्क शिवाय शक्य नाही अन् ह्यांच्या ह्या अकार्यक्षमतेमुळे खूपच लोकांचे नुकसान होत आहे ह्याला जो कोणी जबाबदार असेल त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी व लवकरात लवकर वरील सर्व समस्या सोडवाव्यात.
येत्या आठ दिवसांत जर वरील समस्यांचा तोडगा निघाला नाहीतर परिसरातील नागरीकांसह जयस (जय आदिवासी युवा शक्ति) शिरपूर व इतर सहकारी संघटना व परिसरातील नागरिक मिळुन तीव्र आंदोलन छेड़ून निषेध केला जाईल व यापुढे वरील जबाबदार नेटवर्क कंपन्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला गावात घुसू देणार नाही, तसेच आन्दोलना दरम्यान अनुचित प्रकार झाल्यास त्याला पूर्ण जबाबदार एअरटेल, व्होडाफोन, आयडिया, BSNL आदि नेटवर्क असणार.
वरील विषय गांभीर्याने घेऊन तात्काळ कार्यवाही सुरू करावे असा तीव्र रोष जयस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ.हिरा पावरा व जयस शिरपूर संघटनेचे पदाधिकारी, अन्य समविचारी संघटना व गावपरिसरातील नागरिक ह्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button