Shirpur

? धक्कादायक शिरपूर तालुक्यातील १२ मोरांचा मृत्यू.

? धक्कादायक शिरपूर तालुक्यातील १२ मोरांचा मृत्यू.

भिका चव्हाण शिरपूर

शिरपूर : शिरपूर तालुक्यातील जैतपुर परीसरातील १२ मोर मृत्यू मुखी पडल्याची धक्कादायक घटना गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आले असून विषयुक्त अन्न खाल्यामुळे मोरांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो आहे.
त्याच्यातील एक मोराची प्रकृती गंभीर असल्याने शिरपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरू आहे. शिरपूर तालुक्यातील पहील्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोरांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने वन्य प्राणी मित्रांमध्ये हळहळ करीत पशुवैद्यकीय अधिकार्यांनबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर या मोरांच्या मृत्यू ने वन विभागात खळबळ व्यक्त करण्यात येत आहे.
शिरपूर तालुक्यातील जैतपुर परीसरातील बागायती क्षेत्र जास्त प्रमाणात आहे. तसेच बारमाही पीके जास्त प्रमाणात जास्त असल्याने अन्न व पाणी मुबलक प्रमाणात असल्याने या परिसरात अनेक मोर वास्तव्यात आहेत.
सध्या खरीपाच्या हंगामा सुरू झाल्याने शेत शिवारात कापूस व इतर पिकांची पेरणी करण्यात आली आहे. बियाणे किंवा रोपाला पेरण्या किंवा लावण्या अगोदर बियाण्याला विषारी औषध लावण्यात येते. तेच बियाणे मोरांनी उकरून खाल्याने मोरांचा मृत्यू झाल्याची संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्या परिसरात बागायती क्षेत्र असल्याने व या क्षेत्रात दादा राजपूत यांच्या पडित शेत आहे. शेतात मोठ- मोठे काटेरी झाडे झुडपे आहेत . त्यामुळे या भागात मोरांचे वास्तव्य मोठ्या संख्येने आहे. काल गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्या परिसरात ठिकठिकाणी मोरांचा मृत्यू झाल्याची घटना नागरिकांना दिसून आले.
त्यांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली. वन विभागाचे हिसाळे बिटचे वनपाल कपील पाटील, वन रक्षक मुकेश गुजर, वन्य प्राणी मित्र योगेश वारूळे, अभिजीत पाटील, महेश करंकाळ आदी. अधिकारी व कार्यकर्ते घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. प्राणी मित्र योगेश वारूळे यांना जेव्हा घटनेची माहिती मिळाली तेव्हा लगेच त्यांनी थाळनेर येथिल पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कांबळे यांना सांगून घटनास्थळी पोहोचत मोरांवर उपचार करण्यास विनंती केली परंतु डॉ. कांबळे यांनी आपल्या कर्तव्याचा विसर पडला असल्याचा आरोप प्राणी मित्र योगेश वारूळे यांनी करीत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कांबळे यांचे विषयी नाराजी व्यक्त करीत मृत १२ मोर व १ प्रकृती अत्यवस्थ असलेला मोर वन विभागाच्या कर्मचार्यासह शिरपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाले.
तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश बारी, पशु सहाय्यक डॉ. दिलीप गोरे यांनी जिवंत मोरावर उपचार केले तसेच काहीतरी विषारी पदार्थ खाल्याने विषबाधा झाल्याने मोरांचा मृत्यू झाल्याचे प्रथदर्शनी दिसून येत असल्याने सांगितले आहे.
पण स्थानिक शेतकरी असे म्हणतात आहे की वनविभाग व पशुवैद्यकीय विभागाच्या यांच्या निष्काळजीपणा ने मोरांचा मृत्यू झाला आहे अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button