Shirpur

शिरपूर शहरा मध्ये वाळू माफियांनी थैमान घातले आहे.प्रशासनाचा वाळू माफियांवर नियंत्रण नाही.

शिरपूर शहरा मध्ये वाळू माफियांनी थैमान घातले आहे.प्रशासनाचा वाळू माफियांवर नियंत्रण नाही.

शिरपूर : शिरपूर मध्ये क्रांती नगर, बालाजी नगर, फुले नगर ,सिंगावे गाव या रस्त्यांवर नागरीकांना चालायला भिती वाटायला लागली आहे. कारण वाळूचे ट्रॅक्टर भरधाव वेगाने चालवतात जसे की विमान रस्त्यांने जात आहे.
नागरिकांचे मानसिक संतुलन खराब होण्याची शक्यता आहे. हे वाळूचे ट्रॅक्टर चालवणारे रात्रन दिवस पाहत नाही. नागरिकांची झोपच उडाली. पहिलेच रस्ते खराब असल्यामुळे ट्रॅक्टर जोराने दणदणीत, खळबळ, खडखडाट, आवाज.धूळ उडवत वेगाने घेऊन जातात. लहान मुलांना, बाळांना, वृध्द व्यक्ती, आजारी रूग्ण, पेशंट यांना ट्रॅक्टर चा आवाज सहन करावा लागत आहे. आणि शाळकरी मुलांना ह्या ट्रॅक्टर च्या आवाजाने अभ्यासात अडथळा निर्माण होतोय. आणि नोकरी वर्ग रविवारच्या सणासुदीच्या सुट्टी च्या दिवशी पण नोकरी वर्ग यांना आराम-शांतता नाही.
नागरिकांची अशी पण चर्चा होतेय कि पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन त्यांची घर-दार ,परीवार त्यांची मुल बाळ आपल्या नगरांमध्ये राहत नाही.त्यांना कशाची काळजी वाटेल आपल्या विषयी.आपण का माणस आहोत, ईथे गुरेढोरे,जणावरे राहतात.

अरूणावती नदी पात्रातून रेती चोरी होतेय. हे वाळूचे ट्रॅक्टर खर्दे मार्गे क्रांती नगर, बालाजी नगर, फुले नगर, सिंगावे गाव मार्गे जास्त चालू आहेत त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होतोय.
पहिले कर्तव्य दक्ष प्रशासना मुळे हे वाळू चोरांना वठणीवर आणले होते. पण कोरोना काळानंतर ह्या वाळू माफियांचा उच्चांक वाढला आहे.
ह्या वाळू माफियांवर “महसूल विभाग प्रशासन व पोलीस प्रशासन ” यांचा दबाव नाही.
ह्या वाळू माफियांवर प्रशासनाचा पाठबळ आहे की काय असा गैरसमज नागरिकांन मध्ये होतोय.
ह्या नगरांमध्ये प्रशासनाची चार चाकी पथकाची गाडी सुध्दा फिरतांना दिसत नाही. वाटत कार्यालयाची खुर्ची गरम करत आहेत की काय असा प्रश्न नागरिकांना पडतोय.? प्रशासनाने ह्या वाळू माफियांचे परवाने तपासणी करून कठोरात कठोर कारवाई करावी.
स्थानिक नागरिक व वाळू माफियांन मध्ये वाद निर्माण ,म्हणजे हाणामारी, जिवे मारण्याची धमकी ट्रॅक्टर चा कट वैगरे -वैगरे, गुन्हे गारी वाढली तर पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन विभाग जबाबदार राहतील.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button