Shirpur

माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल व आ. काशिराम पावरा यांच्या अथक प्रयत्नाने तळोदा ते बऱ्हाणपूर हा राष्ट्रीय महामार्ग घोषित

माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल व आ. काशिराम पावरा यांच्या अथक प्रयत्नाने तळोदा ते बऱ्हाणपूर हा राष्ट्रीय महामार्ग घोषित

असद खाटीक शिरपूर

शिरपूर : माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नाने व आ. काशिराम पावरा यांच्या सहकार्याने केंद्र शासनाने रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली च्या वतीने तळोदा ते बऱ्हाणपूर हा राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आला आहे.

केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी यांच्याशी महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल हे सातत्याने पाठपुरावा करत होते.

महाराष्ट्र राज्यात तळोदा पासून शहादा, शिरपूर, चोपडा, यावल, रावेर व मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर हा मार्ग 753 बी ई हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून केंद्र शासनाने घोषित केला आहे.

राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956 अन्वये हा महामार्ग दि. 23 मार्च रोजी डायरेक्टर राजेश गुप्ता यांनी राजपत्राद्वारे घोषित केले.

या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे तळोदा ते बऱ्हाणपूर या राष्ट्रीय महामार्गाचे चित्र बदलणार असून या महामार्गाच्या परिसरातील सर्व नागरिकांनी आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशीराम पावरा यांचे मनापासून आभार मानले आहेत. आमदार अमरिशभाई पटेल हे सातत्याने केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी यांच्याशी हा महामार्ग घोषित होण्यासाठी पाठपुरावा करत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना केंद्र शासनाच्या या राजपत्रातून जाहीर झालेल्या निर्णयामुळे यश आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button