Amalner

Amlaner:पिंपळे नाला बुजला..! योग्य ती कार्यवाही करण्याचे तहसीलदार यांचे मुख्याधिकारी यांना आदेश…

Amlaner:पिंपळे नाला बुजला..! योग्य ती कार्यवाही करण्याचे तहसीलदार यांचे मुख्याधिकारी यांना आदेश…

पिंपळे रस्त्यालगतच्या गट नं. १५१२ ला लागुन असलेल्या नैसर्गीक नाला
बुजल्या सदर्भात तक्रार व मामलेदार कोर्ट अॅक्ट १९०६ प्रमाणे कायदेशीर
कार्यवाही होणे संदर्भात
उपरोक्त संदर्भिप विषयान्वये कळविण्यात येते की, अर्जदार श्री. अनंत रमेश निकम
सामाजीक कार्यकर्ता यांचा पिंपळे रस्त्यालगतच्या गट नं. १५१२ ला लागुन असलेल्या नेसर्गीक नाला बुजल्या सदंर्भात तक्रार व मामलेदार कोर्ट अॅक्ट १९०६ प्रमाणे कायदेशीर कार्यवाही होणे संदर्भात तक्रारी अर्ज इकडील कार्यालयास प्राप्त झालेला आहे. प्रस्तुत प्रकरणी मंडळ अधिकारी अमळनेर यांच्याकडील अहवालानुसार, मौजे अमळनेर येथील पिंपळे रस्त्यालगत नाल्याच्या दक्षिणेस गट नं. १५२५/१/ब यातील प्लॉट नं. २४ क्षेत्र १४८.५ चौ.मी. चा प्लॉट असुन त्यात २४ दुकाने आहेत. सदर गटाला लागुन पश्चिमेकडुन पुर्वेकडे जाणारा नाला दिसुन येत आहे. सदर जागेच्या उत्तर – पश्चिम दिशेकडे सदर नाला बंद झालेला असल्याचे
दिसते. तरी आपणास सदर विषयाबाबत यापुर्वीच संदर्भिय क्र. २ नुसार चौकशी करण्याबाबत कळविण्यात आले होते. तसेच आपण सदर नैसर्गीक नाल्यासंबधी आपल्या अभिलेखांची तपासणी करुन व प्रत्यक्ष वस्तुस्थितीची चौकशी करुन नाला पुर्ववत सुरु करणेकामी आपल्या स्तरावरुन शासन नियमानुसार योग्य ती कार्यवाही करावी. या बाबतचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.असे आदेश मुख्याधिकारी अमळनेर नगरपरिषद यांना तहसीलदार यांनी दिले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button