Dhule

धक्कादायक…!नवीन मोटरसायकल घेऊन जाताना 21 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या..!2 आरोपी घेतले ताब्यात..!

धक्कादायक…!नवीन मोटरसायकल घेऊन जाताना 21 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या..!

असद खाटीक

शिंदखेडा : पोळा सणाचे औचित्य साधून शोरुम मधुन नवीन मोटरसायकल घरी आणत असतांना तरुणाचा अज्ञात संशयितांनी धारदार शस्त्राने वार करत निर्घृण खून करून नवीन मोटरसायकल घेऊन पोबारा केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. घरातील कर्ता एकुलता एक मुलगा होता. मुलाच्या मृत्यूची घटना समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिंदखेडा तालुक्यातील दरणे येथील प्रेमसिंग राजेंद्र गिरासे हा 21 वर्षीय तरुण आज शिंदखेडा येथील शोरुम मधून नवीन प्लाटीना मोटरसायकल घेण्यासाठी गेला होता. पोळा सणाच्या दिवशी प्लॅटीना मोटरसायकल घेऊन घरी परत येत असतांनाच दरणे ते चिमठाणे रस्त्यावरील सबस्टेशन जवळ संशयितांनी त्याचा रस्त्यातच धारदार शस्त्राने वार करत खून करत नवीन मोटरसायकल घेऊन अज्ञात संशयित पोबारा झाले. प्रेमसिंग गिरासे रस्त्याच्या थारोळ्यात पडलेला असल्याचे ये-जा करणाऱ्यांना निदर्शनास आल्यानंतर उपस्थितांनी तात्काळ जवळील चिमठाणे येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर दुखापत असल्याचे बघुन धुळे येथे जाण्याचा सल्ला दिला तेथून धुळे जात असतांनाच रस्त्यावरच प्रेमसिंग गिरासे यांनी जगाचा निरोप घेतला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button