Mumbai

? Breaking News.. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामीना पोलिसांनी केली अटक..

? ब्रेकिंग न्युज.. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामीना पोलिसांनी केली अटक..

प्रा. जयश्री साळुंके

मुंबई – रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी आज सकाळी त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. रायगडच्या अलिबाग येथे इंटिरियर डिझाईनर अन्वेय नाईक यांनी आत्महत्या केली होती, या आत्महत्येसाठी अर्णब गोस्वामी यांनी प्रवृत्त केल्याचा आरोप नाईक कुटुंबीयांनी केला होता. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
कलम ३०६ च्या अंतर्गत पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली असल्याची माहिती आहे.
पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पथकाने अर्णब गोस्वामी यांना अटक केली. अर्णब यांना अलिबागच्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे. यावेळी अर्णब गोस्वामी यांना पोलीस पकडून घेऊन जात असताना त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप लावले. अर्णब गोस्वामी म्हणाले की, मला औषधेही घेऊन दिली नाहीत, मला पोलिसांकडून मारहाण झाली असल्याचा आरोप अर्णबने केला.
काय होतं प्रकरण?
मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर अन्वेय नाईक याने ५ मे २०१८ रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अन्वेय नाईक यांच्या मृतदेहाशेजारीच त्यांच्या आईचा मृतदेह आढळला होता. अन्वेय मधुकर नाईक (५३) यांनी आर्थिक विवंचनेतून स्वत: आत्महत्या केली होती. त्यांच्या कॉनकॉर्ड या इंटेरियर डिझायनर कंपनीला व्यवसायात नुकसान झाले होते, त्यामुळे कर्जदार त्याच्याकडे पैशांचा तगादा लावत होते. याच तणावात त्याने आपले व आईचे जीवन संपविण्याचे ठरविले. अन्वेय नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी रिपब्लिकन टीव्हीचे मालक अर्णब गोस्वामी तर फिरोज शेख व नीतेश सारडा यांनी कामाचे पैसे दिले नसल्यामुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामुळे या तिघांचीही चौकशी पोलिसांमार्फत करण्यात आली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button