Amalner

CAA आणि NRC संविधान कायद्याच्या निषेधार्थ अमळनेर येथे योगेंद्र यादव सरकारवर कडाडले ….देशाची एकता भंग करण्याचा सरकारचा डाव.…

CAA आणि NRC संविधान कायद्याच्या निषेधार्थ अमळनेर येथे योगेंद्र यादव सरकारवर कडाडले ….देशाची एकता भंग करण्याचा सरकारचा डाव.…

आमना घर मा आंमले चोरी -माजी आमदार साहेबराव पाटील

नूर खान

अमळनेर येथिल लोकशाही बचाव नागरी कृति समितीने हिंदुत्ववादी संघटनांच्या कडव्या विरोधानंतर,पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही कृषी चळवळीचे मार्गदर्शक योगेंद्र यादवांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिकांनी छ. शिवाजी महाराज नाट्यगृहात सभा संपन्न.

स्वराज हिंद चे राष्ट्रीय अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी नाट्यगृहाच्या परिसरात आगमन होताच छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुष्प अर्पण करीत पूजन केले.यावेळी “इंनक्लाब जिंदाबाद!” जय जिजाऊ जय शिवराय! हम सब एक है!भारत माता की जय ! घोषणांनी परिसर दुमदुमला.यावेळी संविधान बचाव समितीचे मुकुंद सपकाळे, सचिन धांडे, मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटिल, दलित नेते रामभाऊ संदानशिव,लोकशाही बचाव समितीचे रियजुद्दीन मौलाना,बहुजन क्रांती चे रणजित शिंदे,ऍड रज्जाक शेख,ऍड शकील काझी आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छ शिवाजी महाराज नाट्यगृह इंनक्लाब जिंदाबाद,भारत माता की जय च्या घोषणांनी सभेला सुरवात झाली.

Caa आणि Nrc संविधान कायद्याच्या निषेधार्थ अमळनेर येथे योगेंद्र यादव सरकारवर कडाडले ....देशाची एकता भंग करण्याचा सरकारचा डाव.…

जळगांव चे नेते करीम सालार , मुकुंद सपकाळे यांनी स्वातंत्र्याच्या अधिकाराव घाला घालणाऱ्या संविधान विरोधी कृत्य करणाऱ्या बेगडी हिंदुत्ववादी संघटनांचा तिव्र निषेध नोंदवला.मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटिल यांनी आमच्या घरात आम्हालाच चोरी अश्या आशयाची अहिराणी म्हण सांगत सभेला विरोध करणाऱ्यांचा समाचार घेतला.

कार्यक्रम अध्यक्ष आ.अनिल भाईदास पाटिल यांनी ठणकावून सांगितले की सभेला परवानगी दिली असती किंवा दिली नसती तरी सभा आम्ही घेतलीच असती! एन आर सी साठी माझ्याच आजल्यांची माहिती मिळवणं कठीण आहे तिथं सर्वसामान्य नागरिकांचे काय होईल म्हणून आम्ही देशभर एन आर सी विरोधी आंदोलनाच्या पाठीशी आहोत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button