Indapur

शौर्य प्रतिष्ठानने राबवल्या आँनलाईन विविध स्पर्धा ; छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खास उपक्रम.

शौर्य प्रतिष्ठानने राबवल्या आँनलाईन विविध स्पर्धा ; छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खास उपक्रम.

दत्ता पारेकर

इंदापूर(देवा राखुंडे) शिवरायांचे सुपुत्र आणि हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त इंदापूर मधील शौर्य प्रतिष्ठानने खास आँनलाईन स्पर्धांचे आयोजन करित अनोखा उपक्रम पार पाडला आहे. संस्थापक अध्यक्ष राहुल शेठ गुंडेकर यांच्या खास संकल्पनेतून या विविध आँनलाईन स्पर्धांचे आयोजन केले होते. दि.14 मे ते 17 मे दरम्यान हा सुंदर उपक्रम पार पडला.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या आँनलाईन (ONLINE) स्पर्धेत चित्रकला, निबंध, रांगोळी आदी स्पर्धांचा समावेश होता. विशेष म्हणजे या सर्व स्पर्धा सध्याच्या कोरोन स्थितीवर अवलंबून होत्या. इंदापूरकरांनी या स्पर्धेस भरघोस असा प्रतिसाद दिला. या स्पर्धा फक्त इंदापुर तालुकास्तरा पर्यंतचं मर्यादित होत्या तर या स्पर्धेचे सर्व नियम व सर्वसाधारण माहीती ही WHATS APP व Shourya Production/शौर्य प्रोडकशन,Indapur या फेसबुक पेजवरुन देण्यात अाली.

या स्पर्धांसाठी प्रतिक झोळ, मयुर शिंदे , प्रज्वल गायकवाड, विजय आवटे ,सुमित कुलकर्णी, यांनी स्पर्धा Online असल्या मुळे ग्रुप Admin ची भूमिका बजावली. तर इतर सर्व सदस्यांनी या स्पर्धेची माहीती सर्व कलावंत व त्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचे काम केले. या स्पर्धेचा निकाल दि.17 मे रोजी पुणे चे स्टार Events – Actress – व ज्यांचे एकपात्री – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वर आधारित भतपुर असे कार्यक्रम झाले आहेत व त्यांना नामांकीत बक्षिस भेटलेली आहेत त्या मेघना झुनझम यांनी शौर्य प्रतिष्ठान, इंदापुर च्या फेसबुक पेज वरुन लाइव्ह येऊन जाहीर केला.

या स्पर्धांचे निकाल पुढील प्रमाणे : चित्रकला स्पर्धाचे विजेते अनक्रमे – उमेश अशोक लटके दत्तनगर , सोमनाथ पांडुरंग माने अंबिकानगर , शर्वली सचिन शिंदे संभाजी चौक, सर्व राहणार इंदापूर.

निबंध स्पर्धाचे विजेते अनुक्रमे – श्रेया श्रीहरी आळंदकर- महात्माफुलेनगर रा. बिजवडी, सांवरिया ज्ञानेश्वर पाटील वनगळी, अशिष अनिल शेंडकर अंबिकानगर आणि इंद्रनील संतोष देशमुख इंदापूर.

रांगोळी मध्ये विजेते – मुक्ता कमलाकर काशीद सावतामाळी नगर, समता अशोक शहा शिवाजी चौक, प्रतिक्षा प्रकाश गवळी कासारपट्टा सर्व राहणार इंदापूर. या सर्व तिनही स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरीत करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button