Indapur

मेंढपाळांनी जंगल सत्याग्रहास तयार राहावे . सौरभ हटकर

मेंढपाळांनी जंगल सत्याग्रहास तयार राहावे . सौरभ हटकर

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे:देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झालीत , इंग्रजांच्या जुलमी राजवटी संपवून देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना, मेंढपाळाला त्याची मेंढरे जंगलात गेली म्हणून दिड लाखाचा दंड भरावा लागला. कुठे मेंढपाळ बांधवांवर गोळीबार होतो, कुठे केसेस होतात तर कुठे मेंढरे मरतात पण शासन मदतीला येत नाही. अश्यावेळी मेंढपाळ पशुपालका वर होत असलेल्या अन्यायाबद्दल गप्प राहणार आहोत का? मेंढपाळांच्या न्याय हक्क – संविधानिक अधिकाराचे हनन होत असतांना आपण गप्प राहू शकत नाही म्हणून हा आरोळी मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे .

असे प्रतिपादन सौरभ हटकर यांनी केले .

दिनांक २६ सप्टेंबर २०२० रोजी खामगाव (जि बुलढाणा ) उपविभागीय कार्यालय येथे मेंढपाळांच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी भव्य आरोळी मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते . या मोर्चाला नेतृत्व म्हणून मा आमदार नानाभाऊ कोकरे , शरद भाऊ वसतकार , अशोकभाऊ हटकर , शांताराम भाऊ बोधे , दादाराव हटकर , प्रभाकर वरखेडे , रामाजी शिंगाडे , डा . संतोष हटकर , डा . पांडुरंग हटकर, गोपाळ मरकड यांची प्रमुख उपस्थिती होती .

यावेळी बोलतांना सौरभ हटकर म्हणाले की , इंग्रजांचा वारसा असलेला राजपथाचे नाव बदलून कर्तव्य पथ होत असेल तर इंग्रजांचे वन कायदे का बदलल्या जात नाहीत ?

महात्मा गांधींच्या नेतृत्वात सविनय कायदेभंग आंदोलन झाले होते त्यात १९२७ चा वन कायदा महाराष्ट्रात मोडण्यात आला होता .

त्याच कायद्यान्वये स्वातंत्र्यांनंतर ७५ वर्षांनी मेंढपाळांना १. ५ लाखाचा दंड भरावा लागत असेल , तुरुंगात जावे लागत असेल तर मेंढपाळ पशुपालकांना स्वातंत्र्य मिळाले का ? हा सवाल मला पडतो . त्यामुळे यानंतरचा लढा आपल्या स्वातंत्र्यासाठी संविधानिक मार्गाने लढायचा आहे . असे प्रतिपादन हटकर यांनी केले .

या मोर्च्याला जिल्हाभरातील काशिनाथ बिचकुले, काशिनाथ कोळपे, गजानन बीचकुले, माणिक नाना शिंदे, प्रमोद गोयकर, जगन कारंडे , पंडित बीचकुले, दादाराव शरमाळे शिवाजी मदने, हरिभाऊ करनर, शांताराम शिंगाडे, सुभाष ठोंबरे, माणिक पारखे, राजू हाके, रामा कोकरे, मोहन खताळ, बाळू घुले, महादेव बीचकुले , मोहन तमनर, सतीश कुळाल , मोहन कोळपे, समाधान डोमाळे, बंडू पिसाळ, गजानन कोळपे, विकास थोरात, बबन बीचकुले, शेषराव कोळपे, मंगेश शिंगाडे , पुंडलिक कोळपे, बाळू पारखे, शिवाजी हाके,रवींद्र गुरव,

गजानन कोळपे, गजानन ठोंबरे, साहेबराव गोयकार, अर्जुन पारखे, पृथ्वीराज हटकर , दादाराव कोळपे, सुहास बिचकुले, विश्वास कोळपे, वामन हटकर, राज हटकर, रतन मारकड, अर्जुन मारकड, नंदू मारकड,
कानिराम हटकर, रमेश ठोंबरे, कुंदन कोकरे, कैलाश कारंडे, सैलानी हटकर, अंकुश हटकर, हृषिकेश ठोंबरे,
दादाराव ठोंबरे, भारत हटकर, विपिन हटकर, अविनाश कोळपे, समीर हाके. महादेव हटकर,संदीप काळदाते, मारोती पारखे, प्रदीप बोधे. अंबादास माने सुधाकर हटकर महेंद्र हटकर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button