Maharashtra

राज्य अध्यक्ष नागेज कंडारे यांनी घेतली कामगार मंत्री डॉ संजय कुटे यांची भेट…!

राज्य अध्यक्ष नागेज कंडारे यांनी घेतली कामगार मंत्री डॉ संजय कुटे यांची भेट…!

राज्य अध्यक्ष नागेज कंडारे यांनी घेतली कामगार मंत्री डॉ संजय कुटे यांची भेट...!

 प्रतिनिधी विक्की खोकरे
शेगाव – येथे अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष नागेज कंडारे यानी महाराष्ट्रचे कामगार मंत्री मा. डॉ संजय कुटे यांच्यासमवेत त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन मेहेतर वाल्मिकी समाज व सफाई कामगारांच्या गंभीर समस्या बाबत चर्चा करण्यात आली. 
शेगाव येथील मेहेतर वाल्मिकी समाज बांधवांना शेगाव विकास आराखड्यामध्ये बेघर करण्यात येत आहे. यावर प्रतिबंध करावे असे निवेदन करण्यात आले. यावर मंत्री महोदयांनी सांगितले की मा उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, परंतु या वंचित समाजाला न्याय द्यावा व त्यांना आहे त्याच ठिकाणी राहु द्यावे याकरीता न्यायालयात भुमिका मांडण्यात येईल असे वचन दिले. 
यावेळी जामोदचे नगरसेवक आशिष सारसर, जिल्हा उपाध्यक्ष पवन चावरे, विदर्भ प्रभारी प्रशांत नकवाल, कुणाल गोडाले,आदी  उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button