Nagpur

सरपंच सेवा संघ नागपूर महाराष्ट्र राज्य तर्फे एक दिवसीय वेबिनार सम्पन्न सरपंचांच्या विविध समस्यांवर चर्चा व मार्गदर्शन..

सरपंच सेवा संघ नागपूर महाराष्ट्र राज्य तर्फे एक दिवसीय वेबिनार सम्पन्न
सरपंचांच्या विविध समस्यांवर चर्चा व मार्गदर्शन..

अनिल पवार

नागपूर, ता,26:सरपंच सेवा संघ नागपूर जिल्ह्याच्या वतीने कोव्हिड19 चा वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेता नागपूर जिल्ह्यातील सरपंच सेवा संघ यांच्या मार्फत कोव्हिड19 मध्ये गाव पातळीवर सरपंचाना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता सर्व सरपंचाच्या विविध समस्यांवर नागपूर सरपंच सेवा संघटनेतर्फे zoom वर एक दिवसीय ऑनलाईन वेबिनारचे आयोजन सरपंच सेवा संघाचे नागपूर जिल्हा सचिव सरपंच अतिश पवार यांनी केले .या वेबिनार मिटिंग मध्ये नागपूर जिल्ह्यातील सरपंचांनी आपली हजेरी लावली, यावेळी नागपूर सरपंच सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षा मा, सौ, नलीनीताई सेरकुरे यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेचे सर्व तालुकाध्यक्ष व सरपंचानी ऑनलाईन वेबिनार मध्ये आपली उपस्थिती दर्शविली. सर्व सरपंचांना ग्रामपंचायत स्तरांवर येणाऱ्या अडचणी विषयी चर्चा करण्यात आली.

  • 15 वित्त आयोगातून संगणक परिचालकाचे मानधन देण्यास सर्व सरपंचानी नकार दिला, जिल्ह्यातच नव्हे तर ग्रामीण भागात कोव्हिड19 संसर्गाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या सरपंचाना अति तत्काळ 50 लाखांचा विमा योजना लागू करणे,
  • कोव्हिड19 मुळे राज्य शासनाकडून माझे कुटुंब माझी जबाबदारी हि मोहीम ग्राम स्तरावर राबवितांना सरपंच व आशावर्कर यांना गावपातळीवर निर्माण होणाऱ्या अडचणी.,
  • मनरेगा योजनेंतर्गत विविध कामांचा आढावा घेण्यासाठी पंचायत समितीतर्फे सरपंच मार्गदर्शन शिबिर आयोजित करणे,
  • दुर्गम भागातील गाव पातळीवर नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहावे लागते त्यासाठी शासनाकडून अति तत्काळ उपाय योजना करणे.आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका म्हणून निताताई पोटफोडे यशदा मास्टर ट्रेनर पुणे, (GPDP/NIRD ) सरपंच सेवा संघ महिला जिल्हा अध्यक्ष यांनी सरपंचाच्या विविध प्रश्नाचे उत्तर दिले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. नलिनीताई शेरकुरे सरपंच सेवा संघ नागपूर यांनी अध्यक्ष म्हणून सर्व सरपंचांना मोलाचे मार्गदर्शन केले. व सरपंच सेवा संघ यांची भविष्याची भूमिका काय असणार असल्याचेही यावेळी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून मा. सरपंच अतिश पवार होते. या मीटिंगला सरपंच सेवा संघांचे सर्व तालुका अध्यक्ष उपस्थित होते . व सर्वांनी आपापल्या ग्रामपंचायत स्तरावरील समस्या मांडल्या.यावेळी प्रामुख्याने उपस्थितीत हिंगणा तालुकाध्यक्ष शुभम उडान रामटेकचे अध्यक्ष गणेशजी चोधरी, मौदा तालुकाध्यक्ष नीलकंठजी भोयर, भिवापूर तालुका अध्यक्ष माधुरीताई दडवे, पारशिवनीचे तालुकाध्यक्ष प्रदीपजी दयेवार तसेच जिल्यातील सर्व सरपंच यांनी या मिटिंग मध्ये सहभाग घेतला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button