Nagpur

कास्ट्राइब माफसू कार्यकारिणी उपाध्यक्ष पदी प्रवीण बागडे यांची निवड

कास्ट्राइब माफसू कार्यकारिणी उपाध्यक्ष पदी प्रवीण बागडे यांची निवड

डॉ राजेश सोनुने नागपूर

नागपूर : कास्ट्राइब महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) कर्मचारी संघटनेची कार्यकारिणी अलीकडेच गठीत करण्यात आली. कास्ट्राइब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. या कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी श्री प्रवीण बागडे यांची निवड करण्यात आली.

अध्यक्षपदी प्रज्ञेय ताकसांडे आणि सचिवपदी जितेंद्र हातमोडे यांची निवड करण्यात आली. त्याशिवाय कार्याध्यक्षपदी जालिंदर गजभारे, कोषाध्यक्षपदी संतोष बन्सोड यांची, तर कार्यकारिणी सदस्य म्हणून एस. के. वासनिक, बाळू छापने, अविनाश इंगळे, दीपा डोंगरे, मिलिंद आठवले, निशांत वाकोडे यांचा समावेश आहे. सभेला महासंघाचे सरचिटणीस नरेंद्र धनविजय, रामराव कीर्तने, डॉ. सोहन चवरे, प्रेमदास बागडे आदी उपस्थित होते.

त्यांच्या या निवडीबद्दल कुलगुरू प्रा.डॉ. कर्नल आशिष पातूरकर, अधिष्ठाता पशुविज्ञान डॉ. शिरीष उपाध्ये, संचालक संशोधन नितीन कुरकुरे, संचालक विस्तार डॉ. अनिल भिकाने, अधिष्ठाता (निम्न शिक्षण) डॉ सुनील सहातपूरे, डॉ एन.एन. झाड़े, डॉ. ए.पी. सोमकुवर, डॉ. पी.टी.जाधव, उपकुलसचिव डॉ. अजय गावंडे, तांत्रिक अधिकारी डॉ. सारिपूत्त लांडगे, डॉ. गीतांजली ढुमे, अविनाश इंगळे व श्री अतुल फुले यांनी अभिनंदन केले.

संबंधित लेख

Back to top button