Nagpur

नागपूर हादरलं.. बौद्ध भिक्खू ने केली बौद्ध भिख्खूणीची हत्या…!रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह..!

नागपूर हादरलं.. बौद्ध भिक्खू ने केली बौद्ध भिख्खूणीची हत्या…!रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह..!

नागपूर हे अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. बौद्ध धर्माची दीक्षाभूमी असलेल्या नागपूर शहर तस शांत शहर आहे.पण आज बौद्ध भिक्खुच्या हत्येमुळे हादरलं आहे.सर्वत्र एकदम खळबळ उडाली असून बौद्ध विहारात घडलेल्या ह्या धक्कादायक घटनेने नागपूर वासीय हादरले आहेत. बोधी निवासात एका महिला बौद्ध भिक्खुच्या सोबत राहत असलेल्या पुरुष बौद्ध भिक्खुने हत्या केल्याची घटना घडली आहे.

नागपूर येथील दहेगाव येथील शिवली भिक्खु निवासात सदर घटना घडली आहे.ह्या निवासात श्रामनेरी बौद्धप्रिया ही बौद्ध भिक्खू महिला राहत होती. याच निवासात आरोपी भदंत धम्मानंद देखील राहत होता. दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते.

पुन्हा भांडण झाल्यानंतर भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. तेंव्हा रागाच्या भरात भदंत धम्मानंदने चाकू आणि लोखंडी रॉडने बौद्धप्रिया यांच्यावर वार केले. चाकूचे वर्मी घाव बसल्यामुळे बौद्धप्रिया यांचा जागेवरच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलिस भिक्खु निवासाकडे धावले. घटनास्थळी श्रामनेरी बौद्धप्रिया यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घटनास्थळावर चाकू आणि लोखंडी रॉड पोलिसांनी ताब्यात घेतले. श्रामनेरी बौद्धप्रिया यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे.

या प्रकरणात खापरखेडा पोलिसांनी आरोपी भदंत धम्मानंद याला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button