Nagpur

?️ तुरुंगात चरस..! गुन्हेगारासाठी चरस नेणाऱ्या सुरक्षा रक्षकावर निलंबनाची कारवाई

?️ तुरुंगात चरस..! गुन्हेगारासाठी चरस नेणाऱ्या सुरक्षा रक्षकावर निलंबनाची कारवाई

नागपूर : नागपूरमधील केंद्रीय कारागृहात एका पोलीस सुरक्षा रक्षकानंच अमली पदार्थांचा पुरवठा केल्याची खळबळजनक माहिती समोर आली. ज्यानंतर सदर प्रकरणाचा तपास करण्यात आला. ज्यामध्ये हा सुरक्षा रक्षक दोषी असल्याचं आढळून आलं. परिणामी त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आलं होतं.

बुटांमध्ये तुरुंगात चरस घेऊन जाणाऱ्या 28 वर्षीय सुरक्षा रक्षक सोळंकीला निलंबित करण्यात आलं. पण, यानिमित्तानं गुन्हेगारांना अटकाव घालणाऱ्या या कारागृहात घडणारा धक्कादायक प्रकार समोर आला.

बुधवारी हा सुरक्षा रक्षक त्याच्या बुटात चरस घेऊन जाताना तुरुंगाच्या गेटवर पकडला गेला होता.
तुरुंगात कैद असणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगारासाठी हे चरस घेऊन जात होता ही बाब यानंतर समोर आली आहे. ज्यामुळं गुन्हेगारी कृत्यांमध्ये झपाट्यानं वाढ होणाऱ्या नागपुरात आता कारागृहातील या कारभारावरही अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

दरम्यान, धंतोली पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा रक्षकाकडून ताब्यात घेण्यात आलेल्या 28 ग्राम चरसची किंमत जवळपास 70 हजार रुपये इतकी आहे. तुरुंगात श्रीमंत, व्यसनी गुन्हेगार अशा गोष्टींसाठी बरेच पैसे मोजण्यासाठी तयार असतात. सदर प्रकारची प्रकरणं उघडकीस येताच याबाबतची माहिती समोर येते.

गुन्हेगारांकडून ड्रग्जसाठी कितीही किंमत मोजण्याच्या या प्रकारामुळेच त्यांच्या या पैशांच्या प्रलोभनाला बरेच वेळा कर्मचारी बळी पडताना दिसतात. कुख्यात गुंडांचे वाढदिवस, जेलमध्ये मांडवल्या जाणे, जेल मध्ये चक्क केक येणे, सिगारेटी येणे, मटण चिकनच्या पार्ट्या झोडणे असे किस्से अनेक वेळा रंगले आहेत. पण ही बाब तितकीच गांभीर्यानं विचार करायलाही भाग पाडणारी अशीच आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button