Lonand

पश्चिम महाराष्ट्रातील सलून दुकाने 20 मार्च पासून बंद राहणार नाभिक महामंडळाचा निर्णय

पश्चिम महाराष्ट्रातील सलून दुकाने 20 मार्च पासून बंद राहणार नाभिक महामंडळाचा निर्णय

लोणंद दिलीप वाघमारे

लोणंद शहरातील भवानी माता मंदिर मध्ये महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील सर्व सलून दुकाने शुक्रवार दिनांक 20 पासून पुढील शासकीय सूचना मिळेपर्यंत ंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती पश्‍चिम महाराष्ट्राचे नाभिक मंडळाचे अध्यक्ष शंकरराव मदाने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे भारत देशात कोरूना च्या जीवघेण्या संकटातून बाहेर पडण्यासाठी ोणंद येथे नाभिक महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज रोजी होऊन राज्य अध्यक्ष कल्याण खळे व अन्य पदाधिकार्‍यांची चर्चा करून यावेळी ठोस निर्णय घेण्यात आला या कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष दिलीप साळुंखे बबलू पवार विकास साळुंखे सतीश शिंदे आदी पदाधिकारी कार्यकर्ते भाऊ संख्येने उपस्थित होते .

याप्रसंगी शंकरराव मदाने म्हणाले पश्चिम महाराष्ट्रातील सलून दुकाने आज पासून बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे या निर्णयाला सर्वांनी एकमताने मंजुरी दिली देशामध्ये समाजाच्या हितासाठी निर्णय घेण्यात आला आहे तसेच हा निर्णय सर्व बांधवांना सुरक्षितेसाठी घेतलेला आहे तसेच नाभिक समाजातील सर्व बांधवांनी या निर्णयाचे कोरूना च्या संकटातून बाहेर पडण्यास सर्वांनी मदत करणे काळाची गरज आहे असे आवाहन शंकरराव दिलीप साळुंखे यांनी केले आहे या कार्यक्रमामध्ये नाभिक महामंडळाचे राज्याध्यक्ष सर्व पदाधिकारी लोणंद शहरातील पदाधिकारी व खंडाळा तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button