शहरापासून अंतरावर निर्जन ठिकाणी अज्ञात इसमाचा दगडाने ठेचून करण्यात आली हत्या
अझहर पठाण धुळे
धुळे : धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये अंवर नाला परिसरामध्ये निर्जन ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीचा रक्ताच्या थारोळ्यात मध्ये पडलेला मृतदेह आढळून आला आहे
या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली असून याबाबतची माहिती मोहाडी पोलीस वरिष्ठांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले
एका अज्ञात इसमाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पोलिसांना आढळून आला आहे
दगडाने ठेचून या इसमाचा खून करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून डॉग स्कॉड व फॉरेन्सिक टीम च्या मदतीने पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.






