Lonand

जन्मताच विचित्र बाळ बोलले या व्हाट्सएपच्या अफवेवर जनता रात्र भर जागी विश्वास की अंधविश्वास-

जन्मताच विचित्र बाळ बोलले या व्हाट्सएपच्या अफवेवर जनता रात्र भर जागी विश्वास की अंधविश्वास-

प्रतिनिधी :-लक्ष्मण कांबळे
दिनांक 25 मार्च 2020 रोजी मध्यरात्रीच्या वेळी लातूर जिल्ह्यातील जणतेच्या व्हाट्सएप वर अफवेचा मॅसेज मुल जन्मतः च जनतेला दिला धोकादायक इशारा जो जागेल तो वाचेल व जो झोपेल तो मरण पावेल अशी अफवा व्हाट्सएपच्या माध्यमातून सर्व व्हॅट्सअप ग्रुप वर वाऱ्यासारखी रातोरात फिरताना पहावयास मिळाले तसेच या अफवे मूळे प्रत्येकानी आपापल्या मुंबई पुणे व जिल्ह्यातील व तालुक्यातील नातेवाईकांना फोन द्वारे मध्यरात्री फोन करुण जागी राहण्यासाठी सांगण्यात येत होते या अफवे मूळे गावोच्या गाव रात्रभर जागी राहून रात्र काढल्याचे चित्र अनेक गावांत पहावयास मिळाले आहे पण यात सत्य की असत्य हे च काय कळत नाही.
काही का होईना पण जगातील कोणतेंही मुलं जन्मल्यानंतर किमान सात ते आठ महिन्यानंतर तरच ते बाळ बोलायला हळूहळू शिकत असते
पण काही महाभाग मात्र अश्या अफवा पसरवून जनतेच्या मनात भीती पसरवत आहेत तरी जनतेने अश्या अफवेवर विश्वास ठेवुनये व अश्या अफवा पसरवणाऱयांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी ही चर्चा दुसऱ्या दिवशी करतानाचे चित्र ठिकठिकाणी ऐकन्यात येत होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button