Amalner

?दंगल राजकारणाची..अमळनेरचा विरोधी पक्ष फुलात रमला की घड्याळी च्या काट्यात गुंतला…धनुष्यबाण कुठे रुतला..जियो और जीने दो चा फ़ंडा..?कायशे रे भो यासन.. जनता ईचारी राह्यनी प्रसन..

? अमळनेरचा विरोधी पक्ष फुलात रुतला की घड्याळी च्या काट्यात गुंतला…धनुष्यबाण कुठे रुतला…पंजा तर गायबच झाला..कायशे रे भो यासन.. जनता ईचारी राह्यनी प्रसन..

प्रा जयश्री दाभाडे

अमळनेर अनेक वर्षांपासून अमळनेर चा राजकीय वारसा फारच वेगळा आणि अगदी अटी तटीचा राहिला आहे. या तालुक्याने अनेक दिग्गज नेत्यांची कारकीर्द अनुभवली आहे पहिली आहे.गेल्या काही वर्षात अनेक अटी तटीचे राजकारण तालुक्यात झाले आहे. राजकारण म्हटलं म्हणजे आरोप प्रत्यारोप, आक्षेप,टिका, कुरघोडी इ आलेच.आणि याशिवाय राजकारणात रंजकता ही येत नाही. सामान्य जनता या सर्वांवर लक्ष ठेवून असते.भारतात सर्वात जास्त चर्चा भारतीय राजकारण, क्रिकेट आणि चित्रपट सृष्टी यावरच होते . राजकीय पक्ष, नेते,कार्यकर्ते इ च्या अनेक लहान मोठे वक्तव्य शब्द,टीका इ वर सामान्य जनता प्रतिक्रिया देत असते. विरोध असला म्हणजे,कामांवर लक्ष असले म्हणजे सत्तेत असलेला पक्ष देखील नीट काम करतो जबाबदारी ने काम करतो कारण त्याला विचारणारे विरोधी पक्षनेते हे तितकेच सक्षम असतात आणि जबाबदारी ची जाणीव सत्तेत असलेल्या पक्षाला,नेत्यांना करून देतात.

पण याबाबतीत अमळनेर ची स्थिती काहीशी विचित्र झाली आहे. अमळनेर नगरपरिषदेवर सध्या शहर विकास आघाडीतून निवडून आलेल्या आणि नन्तर भारतीय जनता पक्षात समाविष्ठ झालेल्या पुष्पलता पाटील ह्या नगराध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. आता विषय असा गंभीर आहे की त्यांचे पती माजी आमदार साहेबराव पाटील हे राष्ट्रवादी चे समर्थक आहेत.आणि पूर्ण नगरपरिषदेचे कामही तेच पाहत आहेत. अमळनेर चे सध्याचे आमदार हे राष्ट्रवादी पक्षाचे आहेत.राज्यात सत्ता शिवसेना आणि राष्ट्रवादी अलायन्स ची आहे.त्यामुळे जी काही कामे तालुक्यात होत आहेत किंवा होत नाही आहेत त्यावर कोणीही बोलायला तयार नाही.’तेरी भी चूप और मेरी भी चूप अशी स्थिती निर्माण झाली आहे. माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांनी तालुक्यातील राजकारणा कडे दुर्लक्ष केले आहे. तर त्यांचे समर्थक ही सध्या तरी कोणतीही हालचाल करताना दिसून येत नाही आहेत. काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्ते हे आधीच मागच्या फळीत आहेत कारण कोणताही सबळ नेता सध्या तरी काँग्रेस मध्ये नाही.जुने काही कार्यकर्ते अजूनही काँग्रेसची गाडी हळूहळू चालवत आहेत पण सत्ता धारींना धारेवर धरण्याचे साहस त्यांच्यात नाही. धनुष्यबाण धरणाऱ्यांनी केंव्हाच शस्त्र खाली टाकले आहे आणि तेव्हढी क्षमता किंवा सबळ नेतृत्व सध्या तरी तालुक्यात शिव सेनेच नाही आहे.इतर चिल्लर पार्टी फक्त पार्टी करण्यात व्यस्त आहेत. एक वाघ अकाली गेला आणि एक दिलदार व्यक्तिमत्व थोडं बाजूला सरकल तर सर्व जंगल आमचंच आहे असा भ्रम निर्माण झाला आहे की काय..?

एकूणच काय तर फार मस्त चाललंय तालुक्यात ..राजकीय खाऊ खेळी खेळली जात आहे… what is this..? ह्या बेरंग राजकारणामुळे तालुक्याचे नुकसान होत आहे. चुकीची कामे होत आहेत. बोलणार कोणीच नाही आहे..? आणि जनता आताहाई काय हुई राह्यन याना इचार करी राह्यनी..कथा ग्यात बठ्ठा..? एकच ताट मा खायी राह्यनात..? स्वतःच्या स्वार्थासाठी रात्रीतून पक्ष बदलणारे जनतेला न्याय देतील का..?

लोकांच्या मनात प्रश्न आहेत..नेमकी कोणती खिचडी शिजते आहे..? इथे सर्वच “दादा” मग दादागिरी बंद का..? की फक्त आदा पादा श्यामजी दादा अशी परिस्थिती आहे..?दादागिरी बंद दरवाज्यातून बाहेर का पडत नाही..?बंद दरवाज्याच्या मागे नेमकं काय दडलं आहे..? आपण सर्व भाऊ भाऊ सर्व मिळून एकत्र खाऊ..असं तर नाही ना..? की जियो और जिने दो चा फ़ंडा वापरला जातोय…?बघू या ही नीती कुठं पर्यंत टिकते..?

संबंधित लेख

One Comment

  1. काय बोलणार ताई ? बिलं आडकली आहेत . आम्हीं फक्त त्याच्या गप्पा ऐकण्यातच वेळ घालवला
    नाइलाज शे आम्हना ……

Leave a Reply

Back to top button