Dhule

प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडी येथे नवीन रुजू झालेले वैद्यकीय अधिकारी ह्यांचा सत्कार.!

प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडी येथे नवीन रुजू झालेले वैद्यकीय अधिकारी ह्यांचा सत्कार.!

राहुल साळुंके धुळे

धुळे : शिरपूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडी येथे मागील काही महिन्यांपासून रिक्त असलेले परमानेंट वैद्यकीय अधिकारी पद नवीन वैद्यकीय अधिकारी डॉ.भरत पावरा(एम.बी.बी.एस.) व डॉ.संदीप वळवी(एम.बी.बी.एस.) ह्यांच्या रूपाने पूर्ण झालेले आहे.

नवनियुक्त परमानेंट वैद्यकीय अधिकारी ह्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत श्रीफळ व जयस फेटे देऊन छोटेखानी सत्कार करण्यात आला.
ह्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.नीलिमा देशमुख, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा, डॉ.अनंत पावरा, श्री.महेश पावरा व प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणारे आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, गतप्रवर्टक, आशा कार्यकर्त्या उपस्थित होते.
ह्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणारे सर्व कर्मचारी ह्यांनी आपापली ओळख देऊन नवीन वैद्यकीय अधिकारी ह्यांच्याशी दिलखुलास चर्चा केली.
ह्यावेळी डॉ.नीलिमा देशमुख, डॉ.भरत पावरा, डॉ.संदीप वळवी ह्यांनी सर्वांना सोबत घेऊन ह्या आदिवासी बहुल परिसरात दिवसरात्र वैद्यकीय सेवा देत राहू असे आपले विचार व्यक्त केले.
ह्या छोटेखानी सत्कार समारंभाचे आभार व सुत्रसंचलन डॉ हिरा पावरा ह्यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button