Jalana

जिल्ह्यासाठी कोव्हीशिल्डचे 14,200 तर कोव्हॅक्सीनचे 1800 डोस प्राप्त

जिल्ह्यासाठी कोव्हीशिल्डचे 14,200 तर कोव्हॅक्सीनचे 1800 डोस प्राप्त
जालना : जालना जिल्ह्यासाठी कोव्हीशिल्ड लसीचे 14 हजार 200 डोसेस तर कोव्हॅक्सीनचे 1 हजार 800 डोस प्राप्त झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे़ यामध्येे कोविडशिल्ड लसीचे जिल्ह्यातील सर्व ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रांना व शहरी पाणीवेस, रामनगर व नुतन वसाहत प्राथमिक आरोग्य केंद्रांना वाटप करण्यात येणार आहे़ ही लस 45 वर्षावरील वयोगटातील पहिल्या व दुस-या डोससाठी दिली जाणार आहे.
दुस-या डोसचे अंतर 84 दिवसाचे आहे. त्यामुळे कोविन पोर्टप्रमाणे ज्याचा दुसरा डोस 84 दिवसानंतर येईल त्यांनीच लसीकण केंद्रावर यावे. तसेच कोव्हॅक्सीन लसीचे जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय भोकरदन, घनसावंगी, मंठा, परतुर, उपजिल्हा रुग्णालय अंबड व जिल्हा महिला रुग्णालय जालना येथे वाटप करण्यात आले आहे. ही लस फक्त 45 वर्षावरील वयोगटाकरीता दुस-या डोससाठीच दिली जाणार आहे.
लस घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अपॉईंमेंट घेणे अत्यावश्यक आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरुन इतर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना लस दिली जाणार नाही तर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर येऊ नये. तसेच लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांनी लसीकरण केंद्रावर सामाजिक अंतराचे पालन करण्याबरोबरच गर्दी न करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button