Pune

पुणे पोलीसांची धबाकेबाज कामगिरी; पूर्ववैमनस्यातून खूनाचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपींच्या आवळल्या मुसक्या

पुणे पोलीसांची धबाकेबाज कामगिरी; पूर्ववैमनस्यातून खूनाचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपींच्या आवळल्या मुसक्या

दत्ता पारेकर पुणे

पुणे : आंबेगाव खुर्द परिसरात पूर्ववैमनस्यातून दोन तरुणावर लोखंडी कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला करणा-या फरार टोळक्यांना पुणे पोलीस दलातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे तपास पथकात कार्यरत असलेले मा.पोलीस उपनिरीक्षक श्री.नितीन शिंदे व पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे यांनी जीवाची पर्वा न करतआ अतुलनीय साहस करून पेट्रोल पंपावर थांबलेल्या 5 आरोपींच्या घातक शस्त्रासह मुसक्या आवळल्याची चित्तथरारक कामगिरी केली आहे. तर भारती विद्यापीठ तपास पथकातील पोलीसांनी उर्वरित तीन आरोपींना कात्रज नविन बोगदा परिसरात अटक केली आहे.

पूर्ववैमनस्यातून दोन तरुणावर प्राणघातक हल्ला करणारे लकी अरुण गायकवाड (वय 19),तुषार प्रकाश डोबे (वय 21),तेजस तुकाराम येनपुरे (वय 19),अदित्य जगमोहन सिन्हा (वय 18), सार्थक संगित मिसाळ (वय 19),
शुभम रविंद्र हिरे (वय 21),तुकाराम रामचंद्र येनपुरे (वय 52, सर्व रा.दत्तनगर,जांभुळवाडी रोड, पुणे) असे भारती विद्यापीठ पोलीसांनी अटक केलेल्या आरोपांची नावे आहेत. तर त्यातील एका अल्पवयीन आरोपी मुलाला ताब्यात घेत त्याची येरवडा येथील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,
पुण्यातील आंबेगाव खुर्द परिसरात पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन 8 जणांच्या टोळक्यांनी दोन तरुणावर लोखंडी कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी गंभीर जखमी आकाश अरुण पवार (वय 24, रा. गणराज मित्र मंडळाजवळ, जांभुळवाडी रोड, आंबेगाव बु.) याने दिलेल्या फिर्यादीनुसार 8 जणांविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील फरार आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत.

गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याकामी मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.जगन्नाथ कळसकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार मा.पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती.संगीता यादव व श्री.विजय पुराणीक यांच्या मार्गदर्शनान्वये तपास पथकातील मा.पोलीस उपनिरीक्षक श्री.नितीन शिंदे व श्री.अंकुश कर्चे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टाफ यांच्या दोन टीम तयार करून फरार आरोपींचा दोन टीम द्वारे आंबेगाव पठार, दत्तनगर, खेड शिवापुर, नसरापुर फणशीगाव (वेल्हे), खडकवासला, वारजे, नन्हे घायरी या परीसरात कसोशिने शोध घेण्यात आला.

त्यावेळेस तपास पथकातील मा.पोलीस उपनिरीक्षक श्री.नितीन शिंदे व पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे हे दुचाकीवरून आरोपींचा शोध घेत असताना फरार आरोपी हे एका पेट्रोल पंपावर थांबले असून ते त्यांच्या ताब्यात असलेल्या गाड्यामध्ये पेट्रोल भरत असताना त्यांना दिसले तात्काळ त्यांनी जीवाची पर्वा न करता अतुलनीय साहस दाखवत 5 आरोपींना घातक शस्त्रासह ताब्यात घेतल्याची चित्तथरारक कामगिरी केली आहे. हे सर्व घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाली आहे.

उर्वरित तीन आरोपींचा तपास पथकातील पोलीस अंमलदार अभिजीत जाधव व शिवदत्त गायकवाड यांना कात्रज नविन बोगदा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली त्याआधारे मा.पोलीस उपनिरीक्षक श्री.अंकुश कर्चे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार यांनी सापळा रचून आरोपींना अटक केली आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी ही,
पुणे शहर पश्चिम प्रादेशिक विभागाचे मा.अपर पोलीस आयुक्त श्री.डॉ.संजय शिंदे,
पुणे शहर परिमंडळ 2 चे मा.पोलीस उपआयुक्त श्री.सागर पाटील,
पुणे शहर स्वारगेट विभागाचे मा.सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती.सुषमा चव्हाण,
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.जगन्नाथ कळसकर,
भारती विद्यापीठ पोलीस ठाणे गुन्हे शाखेचे मा.पोलीस निरीक्षक श्रीमती.संगिता यादव व श्री.विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी मा.पोलीस उपनिरीक्षक श्री.नितीन शिंदे व मा.पोलीस उपनिरीक्षक श्री.अंकुश कर्चे, पोलीस हवालदार रविंन्द्र भोसले, रविंद्र चिप्पा, पोलीस अंमलदार गणेश सुतार, शैलेद्र साठे, सचिन पवार, निलेश खोमणे, योगेश सुळ, हर्षल शिदे, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, धनाजी धोत्रे, नवनाथ खताळ, सचिन गाडे, आशिष गायकवाड, विक्रम सावंत, जगदीश खेडकर व शिवदत्त गायकवाड यांनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button