Pune

आदिवासी नेते दशरथ मडावी यांना विधान परिषदेवर घ्या

आदिवासी नेते दशरथ मडावी यांना विधान परिषदेवर घ्या

पुणे – प्रतिनीधी दिलीप आंबवणे

आदीवासी नेते दशरथ मडावी यांना विधान परिषदेवर घेण्याची मागणी बिरसा क्रांती दलाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दशरथ मडावी हे गेल्या 40 वर्षापासुन फुले,शाहू, आंबेडकर विचारधारेशी जूडलेले आहे.सामाजिक,राजकिय ,व कला क्षेत्रात त्यांची कामगीरी वाखाण्यासारखी आहे. ते लेखक ,कवि, नाटककार, दिग्दर्शक असे अष्टपैलु व्यक्तिमहत्व आमच्या समाजाला लाभले आहे. त्यांनी साहित्याच्या माध्यमातुन समाजाची व्यथा व वास्तविकता मांडली आहे.त्यामुळे त्यांची छाप आदिवासी समाजाबरोबर बहूजन समाजावर देखील पडली आहे.त्यांच्या उत्कृष्ठ वक्तृत्व शैलीमुळे बहूजन समाजात ते लोकप्रिय आहेत. दशरथ मडावी यांना महाराष्र्टातील विविध भागात असनार्या ,वेगळी जीवनशैली,प्रथा ,परंपरा असलेल्या 45 आदिवासी जमातीचा सखोल अभ्यास असुन त्यांचे समाजाशी जीव्हाळ्याचे नाते आहे.त्यांना महाराष्ट्र शाासनाचा ” आदिवासी मित्र ” या पुरस्काराने सन्मानित केले आहे. आदिवासी समाजाला एकसंघ करण्यासाठी त्यांनी सन 2015 ला बिरसा क्रांती दल संघटनेची स्थापना केली आहे. हे संघटणा कॅडर बेस असुन आदिवासी समाजातील खूप मोठा युवा वर्ग यात सामील आहे. संपूर्ण महाराष्ट्रात संघटणे च्या शाखा आहेत.त्यामुळे त्यांचा महाष्र्टातील कार्यकत्याशी प्रत्यक्ष संर्पक आहे.
अश्या बहूआयामी सामाजिक जाण असलेल्ला अभ्याासु व्यत्तक्तिमत्वाला आदिवासी समाजाचे व बहूजन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या महाविकास आघाडी च्या माध्यमातून विधान परिषेदेवर पाठवावे असा संपूर्ण आदिवासी समाजाचा मानस आहे.
आज महाराष्ट्रात आदिवासींच्या अनेक प्रश्नांवर अनेक प्रश्नचिन्ह असते.या प्रश्नाला उत्तर म्हणजे दशरथ मडावी. मागील बिजेपी सरकारच्या काळात आदिवासीच्या हक्कावर गदा आणन्याचे काम विषमतादी सरकारकडून करण्यात आले.मोठ्याप्रमाणात आदिवासी समाजावर अन्याय,अत्याचार करण्यात आला आहे.आपले सरकार सत्तेवर आल्यावर आदिवासींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आदिवासीचे शोषण,बालमजुरी, आदिवासी विकास विभागाचा भष्टाचार अश्या अनेक गोष्टींना वाचा फोडण्यासाठी संपूर्ण महाराष्र्टामध्ये आदिवासी समाजाचा पाठीचा कणा असनारे एक झुंझार नेता दशरथ मडावी यांना महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातुन विधानपरिषेदेवर पाठवावे.
अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे राज्य सचिव डी बी घोडे, राज्य उपाध्यक्ष विजय आढारी, पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे, पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय कोकाटे, उपाध्यक्ष संजय मेमाणे, संघटक विक्रम हेमाडे, नगरसेवक राहुल आढारी, खेड तालुका अध्यक्ष रोहित सुपे, मावळ तालुका अध्यक्ष अंकुश चिमटे, महासचिव उमाकांत मदगे, जुन्नर तालुका अध्यक्ष दत्तात्रय गवारी, हरिभाऊ तळपे, संतोष भांगे, सरपंच सुधीर भोमाळे, शशिकांत आढारी यांनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button