Delhi

Politics:काँग्रेस चे जेष्ठ निष्ठावंत नेते गुलामनबी काँग्रेस मधून “आझाद”..दिला राजीनामा..!पहा कारणे..!

Politics:काँग्रेस चे जेष्ठ निष्ठावंत नेते गुलामनबी काँग्रेस मधून “आझाद”..दिला राजीनामा..!पहा कारणे..!
काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि गांधी घराण्याचे निकटवर्तीय गुलाम नबी आझाद यांनी अखेर काँग्रेसची साथ सोडली आहे. आझाद यांनी पक्षाच्या सदस्यत्वासह इतर पदांचाही राजीनामा दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाच पानांचा राजीनामा त्यांनी पाठवला आहे.

गुलाम नबी आझाद गेल्या बऱ्याच काळापासून पक्षावर नाराज असून पक्षाविरोधात बंड करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. आज अखेर त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबत साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असं गुलाम नबी आझाद यांनी आरल्या राजीनाम्यात लिहलं आहे. त्याचबरोबर, पक्षाला भारत जोडो यात्रेबरोबरच काँग्रेस जोडो यात्रासुद्धा राबवण्याची गरज आहे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

आझाद यांनी सोनिया गांधींना सोपवलेल्या राजीनामा पत्रात राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस पक्ष तुमच्या नेतृत्वात चांगलं काम करत होता. मात्र, दुर्दैवानं जेव्हा पक्षात राहुल गांधी यांची एन्ट्री झाली आणि २०१३मध्ये तुम्ही त्यांना उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले तेव्हा पक्षातील संवादच संपला. सर्व वरिष्ठ आणि अनुभवी नेत्यांना जाणीवपूर्वक बाजूला काढण्यात आले. अनुभव नसलेले नेते पार्टीचं कामकाज पाहू लागले, असं खंत त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे.
काँग्रेसमध्ये ‘निष्ठावंत’ वर्गातल्या पहिल्या थरात वावरणारे नेते म्हणून गुलाम नबी आझाद यांची ओळख होती. तसंच, जी-२३ गटाचे प्रमुख नेतेही आझाद होते. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस पक्षातील मतभेद उघडपणे समोर आले आहेत. गुलाम नबी आझाद आणि काँग्रेस पक्षातही फूट पडल्याची चर्चा आहे. पक्षात संघटनात्मक बदल व्हावेत यासाठी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांमध्ये त्यांचाही समावेश होता. आझाद यांना राज्यसभेत पुन्हा संधी नाकारल्यानंतर ते नाराज असल्याचं बोललं जात होतं.

आझाद यांच्या राजीनाम्याआधी पक्षातील आणखी काही वरिष्ठ नेत्यांनी राजीनामा दिला आहे. कपिल सिब्बल यांनी राज्यसभेच्या तोंडावर काँग्रेसचा राजीनामा देत समाजवादी पार्टीत प्रवेश केला होता. त्यांना सपाकडून राज्यसभेवरही पाठवण्यात आलं आहे. त्यानंतर आता गुलाम नबी आझाद आता कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याबाबत चर्चा रंगल्या आहेत.
जम्मू काश्मीरच्या प्रचार समितीच्या प्रमुखपदाचा राजीनामा

दरम्यान, जम्मू काश्मीर प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती केल्यानंतर आझाद यांनी काही तासांतच राजीनामा दिला होता. तेव्हाच आझाद हे पक्षावर नाराज असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले होते. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव पक्षाने दिलेली जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला, असं पक्षाकडून सांगण्यात येत होतं.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button