Jalana

कर्जत येथे शेतकर्‍यांना मोसंबी बागायतदार संघ व संशोधन केंद्राच्या वतीने मार्गदर्शन व मोसंबी फळगळती,योग्य व्यवस्थापन गरजेचे – डाॅ.संजय पाटील

कर्जत येथे शेतकर्‍यांना मोसंबी बागायतदार संघ व संशोधन केंद्राच्या वतीने मार्गदर्शन व मोसंबी फळगळती,योग्य व्यवस्थापन गरजेचे – डाॅ.संजय पाटील

संजय कोल्हे जालना

जालना : सध्या मोसंबी बागायतदार शेतकरी हे मोसंबी फळगळतीने चिंतेत असुन त्यांनी घाबरुन न जाता ,काही बाबी करणे गरजेचे आहे यामध्ये पाळी न मारल्याने मुळाची कार्यक्षमता थांबली आहे.शेतात गवत वाढलेले आहे.त्याच बरोबर झाडाची योग्य निगा राखणे गरजेचे आहे.झाडावरील वाढलेल्या वेली काढुन टाकाव्यात,डासांचा प्रकोप वाढत आहे यासाठी लाईट ट्रॅप लावावे,झाडाला अधिक फळे असतील तर झाडावर लोड येत आहे. शेतकर्‍यांनी ग्रुपमध्ये चर्चा करत राहणे गरजेचे आहे .त्याच बरोबर फळ गळती बाबत योग्य व्यवस्थापन केल्यास फळगळती आपण रोखु शकतो अशी माहिती बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्ञज्ञ डाॅ.संजय पाटील यांनी दिली.
अंबड तालुक्यातील कर्जत येथे जालना जिल्हा फळे व मोसंबी बागायतदार संघ व मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार,(दि-१०) रोजी शेतकरी चर्चा सञाचे आयोजन करण्यात आले होते.अन्नद्रव्य व्यवस्थापन,युरियाची कमतरता,बुरशी नाशकाचे स्प्रे मारणे आदी बाबत डाॅ.पाटील यांनी माहिती दिली.
या चर्चा सञात भौगोलिक नामाकंन (जी.आय) माहीती, सिट्रस नेट प्रणालीवर बागेची नोंदणी करणे , मोसंबी फळ गळ व रोग व्यवस्थापन (एकात्मीक किड व रोग व्यवस्थापन) या बाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
याप्रसंगी मोसंबी बागायतदार संघाचे सदस्य दादासाहेब गोडसे,विजय डोंगरे,ज्ञानेश्वर डोंगरे,जनार्दन वाघ,रमेश येडे आप्पासाहेब डोंगरे,सुरेश उगले,अशोक उगले,महाजन सुलाने,भिमराव मुंडे,विष्णू दहिफळे यांच्यासह दोनशे ते अडीचशे शेतकरी उपस्थित होते.
____________________

सोनेरी माशीचा प्रादुर्भाव,मत्स्यकारी ट्रॅप लावा – पांडुरंग डोंगरे…..

मोसंबी बागावर मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव पडल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.त्यातच मोसंबी बागेत सध्या सोनेरी माशीचा प्रादुर्भाव वाढत चालला असून तालुक्यात कर्जत या ठिकाणी ही माशी आढळून आली.यासाठी आम्ही सर्व जण एका येत चर्चा करून उपाययोजना केल्या.यासाठी शेतकरी बांधवांनी मत्स्यकारी ट्रॅप लावावे.आॅगस्ट महिन्यात डासाचे प्रमाण वाढते यासाठीही इलेक्ट्रिक/ सौरउर्जेवरील लॅम्प लावावे व त्या लाईटखाली पाणी ठेवावे त्यामुळे आपण ८५ ते ९०% गळ थांबवू शकतो. शेतकऱ्यांनी गटचर्चा करण्यावर भर द्यावा.प्रती झाडाला २०० ग्राम युरिया टाकावा व आडवी व उभी पाळी मारुन घ्यावी.

पांडुरंग डोंगरे
जालना जिल्हा फळे व मोसंबी बागायतदार संघ अध्यक्ष.
______________

संबंधित लेख

Back to top button